Kanifnath Temple, Madhi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Madhi: मोठी बातमी! मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी; सात जण गंभीर जखमी

Pradeep Pendhare

Ahmednagar News: राज्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी झाली. यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही गटातील झालेल्या हाणामारीत लाट्या-काठ्या आणि लोखंडी गजाचा वापर झाला.

अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त विश्वजीत डोके व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

अनेक दिवसांपासून कानिफनाथ देवस्थानच्या ट्रस्टमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिव निवडीवरून धुसफूस चालू होती. आज सकाळी देवस्थान समितीच्या सभागृहामध्ये सर्व विश्वस्त मंडळाची अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक बोलवण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीमध्ये निवडीचा वाद उफाळून आला. यात जोरदार हाणामारी झाली. विश्वस्त मंडळामध्ये दोन गट पडले असून अनेक दिवसांपासूनचा या वादाचे गुरूवारी हाणामारी रूपांतर झाले. या हाणामारीमुळे नाथ भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहेत. मढी देवस्थानमध्ये प्रत्येक विश्वस्त मंडळांमधील वाद दरवर्षी पाहायला मिळत आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष सरपंच संजय बाजीराव मरकड, संकेत संजय मरकड, प्रतीक दत्तात्रेय काळदाते, सुनील ज्ञानदेव निमसे, अक्षय राजेंद्र कुटे, विश्वस्त शिवजीत बलभीम डोके, प्रसाद बलभीम डोके हे हाणामारीत जखमी झाले आहेत. भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी संजय मरकड यांची विचारपूस केली.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT