Karjat Missing Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karjat Missing Case : मिसिंगची तक्रार, उघड झाले दोन मर्डर! अजून दोन हत्यांचा संशय; तरी अकोला PIचा ‘डिटेक्शन दाखवू नका’चा सूर

Investigation into a missing complaint in Karjat-Mirajgaon leads Ahilyanagar LCB to uncover a shocking double murder linked to an Akola criminal : अहिल्यानगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मिसिंगचा तपास करताना दोन मर्डरचा उलगडा केला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar police LCB investigation : अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलिस ठाण्यात दाखल मिसिंगच्या तक्रारीत, पुढे दोन मर्डरचा उलगडा झाला. अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा गुंता उघडकीस आणला. अहिल्यानगरमध्ये एक, तर दुसरा मर्डर थेट अकोला जिल्ह्यात केला आहे.

अकोला (Akola) इथल्या मर्डरचा उलगडा अहिल्यानगर पोलिसांकडून होत असल्याचं लक्षात येताच, तिथल्या पोलिस अधिकाऱ्याने गुन्ह्याचं डिटेक्शन दाखवू नका, असं विधान केलं. पण या आरोपीविरोधात आणखी दोन मर्डरचा संशय असल्याने अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी, गुन्ह्याची उकल करण्यासाठी अधिकच कंबर कसली.

मिरजगांव पोलिस (Police) ठाण्यात आकाश बापू गाढवे यांच्या खबरीवरून 05 मार्च मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनुसार बापू आनंदा गाढवे (वय 60, रा. चिंचोली रमजान, ता. कर्जत) याचा शोध घेतला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.

पोलिसांनी मिसिंग व्यक्तीच्या नातेवाइकांकडे चौकशी सुरू केली. मिसिंगची तक्रार देणारा आकाश गाढवे याच्याकडे पोलिसांनी बारकाईने तपास केल्यावर, त्याच्याकडून सुनील रामदास राठोड व त्याचे नातेवाईकांनी मिसिंगमधील इसमाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला.

सुनील राठोड याची पोलिसांनी माहिती मिळवली. सुनील हा त्याचा मित्र सचिन सारवान (रा. खळवाडी, शेगाव) याच्या घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सुनीलला ताब्यात घेण्यासाठी सचिनच्या घरावर छापा मारला असताना, त्याने घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला.aj

दोघे पसार?

सुनील राठोड (वय 37, रा. नानासाहेब पातुर, ता. पातुर, जि. अकोला, हल्ली - रा. आंबेठाण रोड, चाकण, पुणे) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आणि आकाश बापू गाढवे, पायल आकाश गाढवे उर्फ आकांक्षा (दोघे रा. रमजान चिंचोली, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, प्रथमेश दिगंबर चांदुरकर उर्फ भावेश, अमोल भिकाजी लाटकर (दोघे पसार, दोन्ही रा. पुनोती, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांना, मयत बापू आनंदा गाढवे हे, त्यांची शेतजमीन विकून पैसे घ्यावयाचे होते.

शेतजमीनसाठी सासऱ्याचा खून

परंतु मयत बापू आनंद गाढवे हे शेतजमीन विकू देत नव्हते. या कारणावरून चार जानेवारीला दुपारी दीड वाजता, बापू गाढवे याला राहते घरामध्ये तोंडावर उशी ठेवत, तोंड दाबून आणि गळा आवळून मारलं. यानंतर घराजवळील लाकडे गोळा करत डिझेलचे सहाय्याने प्रेत जाळून टाकले. पोलिस चौकशीत तशी माहिती दिली.

प्रेयसीचा खून

अहिल्यानगरमधून पसार होत सुनील राठोड हा अकोला इथं आणखी एक खुनाची माहिती दिली. शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हिचेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. शीतल ही त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. या कारणावरून तिला त्याने 16 नोव्हेंबर 2025 ठार केलं.

अकोला पोलिस कारभारावर प्रश्नचिन्ह

यानंतर तिचं प्रेत धनेगांव (ता. बाळापुर, जि. अकोला) परिसरामध्ये जाळून टाकलं. परंतु प्रेत अर्धवट जाळले. यावरून अकोला इथल्या बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा देखील उलगडा झाला आहे. हाच गुन्ह्याचा उलगडा दाखवू नका, असे विधान पोलिस अधिकाऱ्यानं केल्याचं समोर आलं आहे. मयत बापू आनंदा गाढवे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या फिर्यादीवरून मिरजगांव पोलिस ठाण्यात दाखल मिसिंग तक्रारीचं पुढे हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT