Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताची पोलिसांत तक्रार; कोणी केली? तक्रारीत नेमकं काय लिहिलं? पुढे काय होणार?

Sharad Pawar-led NCP faction has filed a complaint at the Shirdi police station demanding an investigation into the alleged plane crash incident involving DCM Ajit Pawar in Baramati intensifying political debate in Maharashtra : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.
Ajit Pawar Plane Crash Investigation
Ajit Pawar Plane Crash InvestigationSarkarnama
Published on
Updated on

Shirdi police complaint : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली.

शिर्डी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारतींकडे तक्रारीचं निवेदन देत, कारवाईची मागणी केली. शिर्डी पोलिसांनी तक्रारीचं निवेदन घेत, पुढील चौकशीसाठी बारामती पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) हवाई मार्गाने प्रवास करत असलेल्या विमानाला 28 जानेवारीला बारामती (जि. पुणे) इथं अपघात झाला. हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तक्रारी निवेदनात करत, संबंधित विमान कंपनी, कटात समील असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी तक्रारी निवेदनातून करण्यात आली.

कटात समील असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी मागणी केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली हे तक्रारी निवेदन उपअधीक्षक अमोल भारती यांना दिले.

Ajit Pawar Plane Crash Investigation
Maharashtra LPG Consumption : महाराष्ट्राची 'इंधनभूक' किती? एका क्लिकवर मोठा खुलासा!

या प्रकरणात VSR Ventures Private Limited ही विमान कंपनी, तिचे संचालक विजय कुमार सिंह व रोहित कुमार सिंह, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) चे संबंधित अधिकारी, तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि आवश्यक तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली, असा गंभीर आरोप तक्रारी निवेदनात करण्यात आला आहे.

Ajit Pawar Plane Crash Investigation
Sagar Moholkar : मोहोळकराच्या शरीरात अजूनही चार बुलेट्स; गोळीबारानंतरचे 10 दिवस, पैलवानच्या प्रकृतीबाबत धक्कादायक अपडेट

हा विमान अपघात नसून संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि नियमांचे जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन आहे. घटना गंभीर आहे. यात गुन्हेगारी कटाचा संशय आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही तक्रारी निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी पहिल्यापासून संशय व्यक्त करत आहेत. याबाबत त्यांनी राज्यातील प्रमुख सत्ताधाऱ्यांच्या भेटी घेऊन तक्रारी निवेदन दिलं आहे. तसंच देशाची विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची भेट घेऊन, अजितदादांच्या विमान अपघाताकडे लक्ष वेधलं आहे.

शिर्डीत याप्रकरणी तक्रार दाखल झाल्याने अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केल्याने, अजितदादांचा अपघात मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. शिर्डी पोलिसांनी या तक्रारीचे निवेदन पुढे बारामती पोलिसांकडे कारवाईसाठी वर्ग केलं आहे. या निवेदनावर तिथून काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com