Kashinath Date Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kashinath Date Won Election : अजितदादांच्या काशिनाथ दातेंकडून खासदार लंकेंना धोबीपछाड; राणी लंकेंचा पराभव

Kashinath Date Won Parner Assembly Election 2024 final result : पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राणी लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते, शिवसेना ठाकरे पक्षाचे संदेश कार्ले यांच्या तिरंगी लढत होती.

Pradeep Pendhare

Parner Assembly Election 2024 final result : सोपा वाटत असलेला विजय पराभवात बदलल्यावर काय होते, त्याचा प्रत्यय पारनेर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पारनेरमध्ये पराभव झाला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांना धोबीपछाड देत त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काशिनाथ दाते मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. अटीतटीची लढत होईल, असे मतमोजणीचे कल येते होते. परंतु दाते यांनी 1 लाख 12 हजार 775 मते घेत विजय मिळवला. राणी लंके यांना 1 लाख 10 हजार 369 मते मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडखोरी केली होती. त्यांना 10 हजार 645 मते मिळाली. कार्ले यांची उमेदवारी लंके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) सुजय विखे यांचा पराभव केल्यापासून पारनेर विधानसभेची जागा रिक्त होती. लोकसभेत पारनेर विधानसभा निवडणुकीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. लोकसभा निवडणुकीत पती नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी पारनेर पिंजून काढला होता. या काळात त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती तयार झाली होती.

विजयाचे वारे फिरले होते

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पारनेर मतदारसंघ आपल्याकडे ठेवत, काशिनाथ दाते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काशिनाथ दाते यांनी शेवटच्या टप्प्यात नीलेश लंके आणि राणी लंके यांना चांगलेच आव्हान उभे केले होते. अजित पवार यांना पारनेरमध्ये सभा घेऊन चांगले वातावरण निर्माण केले होते. त्याचा फायदा काशिनाथ दाते यांना झाला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काशिनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि विजयाचे वारे फिरवलं.

ती फक्त चर्चाच ठरली

पारनेरची जागा मिळावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मातोश्रीवर चकरा मारल्या. परंतु त्याचा काहीच फायदा झाला. पारनेर आणि नगर शहराची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव ठेवला, त्याचीही फायदा झाला नाही. यातून कट्टर शिवसैनिक संदेश कार्ले यांनी बंडखोरी केली. संदेश कार्ले यांचे संघटन कौशल्य, नगर तालुक्यात खूप मोठे आहे. पारनेर मतदारसंघातील बरीच गावे नगर तालुक्यात येत असल्याने लंके यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. संदेश कार्ले यांनी वातावरण निर्मितीत अदृश्य शक्तीचे बळ मिळाल्याची चर्चा होती. यातून तिरंगी लढतीचे चित्र होते. माजी आमदार विजयराव औटी देखील निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे होते.

2024 मधील उमेदवार

काशिनाथ महादू दाते (NCP), भाऊसाहेब बाबाजी जगदाळे (BJKP), सखाराम मालू सारक (RSPS), अविनाश मुरलीधर पवार (MNS), राणी निलेश लंके (NCPSP), अविनाश उत्तम थोरात (IND), माजी आमदार विजय सदाशिव औटी (अपक्ष), संदेश तुकाराम कार्ले (अपक्ष), रवींद्र विनायक पारधे (अपक्ष), विजयराव औटी (अपक्ष), प्रवीण सुभाष दळवी (अपक्ष), भाऊसाहेब माधव खेडेकर (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

2019च्या विधानसभा निवडणुकीत पारनेरमध्ये शिवसेनेत बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले नीलेश लंके यांनी 1 लाख 39 हजार 963 मतं मिळवून विजय मिळवला. दुसऱ्या स्थानी शिवसेना पक्षाचे विजयराव भास्करराव औटी होते. लंके यांचा विजयी 59 हजार 838 मतांनी झाला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचा विजयराव औटी यांनी 73 हजार 263 मतांसह विजय मिळवला. दुसऱ्या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुजित वसंतराव जावरे पाटील होते. विजय औटी यांचा 27 हजार 422 मतांचा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT