Sharad Pawar & Other leaders
Sharad Pawar & Other leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar: गैरसमज दूर करत सर्वांना सोबत घेऊन चालावे

Sampat Devgire

नाशिक : राज्‍यातील (Maharashtra) प्रदीर्घ इतिहास असलेल्‍या शैक्षणिक (Education) संस्‍थांपैकी मराठा (Maratha) विद्याप्रसारक समाज संस्‍था ‍आहे. संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सभासदांचा कौल, समज-गैरसमजांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. (Sharad Pawar instructs MVP office bearors to go with all togather)

मराठा विद्या प्रसार समाज संस्थेची निवडणूक येत्या महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार आणि कार्यकारी मंडळाने संस्थेची वाटचाल व इतिहासाचा समावेष असलेला ‘बखर’ या इतिहासाच्या पहिल्या खंडाचे आणि कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पत्रांचा संच असलेल्या ‘बोधामृत’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी संस्थेतील प्रतिस्पर्धी पॅनेलचे अॅड नितीन ठाकरे यांनी (कै) बाबूराव ठाकरे यांच्याविषयी लेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन स्वतंत्र कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी श्री. पवार म्हणाले, कर्मवीरांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था मोठ्या कष्टातून उभी केली आहे. त्‍यांनी घेतलेली मेहनत व संस्‍थेचा गौरवशाली इतिहास नव्‍या पिढीपर्यंत पोचण्यास प्रकाशित होत असलेली पुस्‍तके महत्त्वपूर्ण ठरतील.

श्री. पवार म्‍हणाले, की अलीकडे शैक्षणिक संस्‍थांचा व्‍यवसायाशी संबंध असतो. परंतु, राज्‍यातील निवडक शैक्षणिक संस्‍थांना सामाजिक शैक्षणिक इतिहास असून, ‘मविप्र’चा इतिहासदेखील गौरवशाली आहे. समाजाच्‍या भवितव्‍याचा विचार करत योगदान देणाऱ्या संस्‍थांपैकी ही एक संस्‍था असल्‍याचे त्‍यांनी मनोगतात नमूद केले. सरचिटणीस पवार म्‍हणाल्‍या, की कर्मवीरांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची उभारणी करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची वाट निर्माण केली. त्‍यांचे कार्य आजच्या पिढीला समजावे हा इतिहास प्रकाशनामागचा उद्देश आहे.

यावेळी माजी पालकमंत्री छगन भुजबळ, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे, हेमंत टकले, माजी खासदार देवीदास पिंगळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना हिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, दत्तात्रेय पाटील, उत्तमबाबा भालेराव, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, रायभान काळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे आदी उपस्‍थित होते.

प्रा. डॉ. दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. इतिहास लेखन व पुस्तक निर्मितीमधील कार्याबाबत अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा. अशोक सोनवणे, प्रा.बिरारी व संस्थेतील कलाशिक्षकांचा या वेळी सत्‍कार झाला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT