Former Mayor Kulbhushan Patil addresses media in Jalgaon regarding alleged fake birth certificate controversy involving BJP corporator Zakir Khan. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT vs BJP : दोन मुलींच्या जन्मात केवळ 15 दिवसांचं अंतर! सोमय्यांनी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात भाजप नगरसेवकच अडकणार

Fake Birth Certificate Controvercy : मागील अनेक दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. पण आता सोमय्यांनी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात भाजप नगरसेवकच अडकण्याची चिन्ह दिसत आहेत.

Sampat Devgire

Jalgaon News, 01 March : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्यांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने कारवाई करावी हा त्यांचा आग्रह आहे. यावरून राज्यभरात राजकारण तापले आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपला चांगलेच कोंडीत पकडले आहे.

पाटील यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत बनावट कागदपत्रांचा गैरप्रकार उघड केला आहे. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक अडकले आहेत. भाजपचे नगरसेवक जाकीर खान रसूल खान यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. शासकीय लाभ मिळविण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र केल्याचे आरोप आहे.

विशेष म्हणजे भाजप नगरसेवक जाकीर खान यांनी निवडणूक आयोगालाही खोटी माहिती दिल्याचा आरोप होत आहे. कुलभूषण पाटील यांनी जाकिर खान यांच्या दोन मुलींचे जन्म दाखले सादर केले आहेत. यामध्ये एका मुलीचा जन्म २ सप्टेंबर २००० तर दुसऱ्या मुलीचा जन्म १७ सप्टेंबर २००० असा आहे. जळगाव महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाने हे जन्म दाखले दिले आहेत.

भाजपचे नगरसेवक जाकीर खान यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तीन अपत्य असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक्षात त्यांना पाच अपत्य आहेत. त्यांनी शासनाला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा दावा माजी उपमहापौर पाटील यांनी केला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत नगरसेवक जाकीर खान यांच्यावर फसवणूक प्रकरणी कारवाई करावी.

अन्यथा या कारवाईसाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे पाटील म्हणाले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे जाकीर खान निवडून आलेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस झाले असतानाच पाटील यांनी हा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात नगरसेवक जाकीर खान यांनी मात्र या विषयात राजकारण होत असल्याचा दावा केला. पण सादर केलेली प्रमाणपत्र वैध आणि अधिकृत आहेत.

या संदर्भात न्यायालयात देखील सुनावणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच या आरोपातील फोलपणा स्पष्ट होईल. भाजपने बनावट जन्म दाखल्यांचा विषय राज्यभर चर्चेत ठेवला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट केले आहे. असे असताना आता भाजपचाच नगरसेवक यामध्ये अडकल्याचे पुढे आले आहे. या संधीचा राजकीय फायदा घेत उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने भाजपला चांगलेच कोंडीत पकडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT