Eknath Khadse : 'अवैध वाळू उपसा व्यवसायाला सरकारचे संरक्षण असल्यानेच प्रशासन कारवाई करण्यास घाबरते...'

Eknath Khadse on Jalgaon Sand Mining : जळगाव जिल्ह्यातील राजकीय नेते आणि प्रशासन वाळू माफियांच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा खडसेंनी केला. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना विनंती करूही कारवाई होत नाही. त्यामुळे यामध्ये सर्व यंत्रणा सामील असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.
Eknath Khadse On Mahayuti Govt
Eknath Khadse On Mahayuti GovtSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 01 March : जळगाव जिल्ह्यातील गिरणा आणि तापी नद्यांसह सगळीकडे वाळू उपसा सुरू आहे. या अवैध वाळू उपसा व्यवसायाला सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास घाबरते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात विधान परिषद गाजवली. गेले काही दिवस जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा विषयावर त्यांनी गंभीर आरोप केले. राज्य सरकारवर त्यांनी नाकर्तेपणाचा शिक्का मारला.

जळगाव जिल्ह्यातील राजकीय नेते आणि प्रशासन वाळू माफियांच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा खडसेंनी केला. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना विनंती करूही कारवाई होत नाही. त्यामुळे यामध्ये सर्व यंत्रणा सामील असल्याचा दावाही खडसेंनी केला.

वाळू माफिया यांच्यावर कारवाई करावी, यासाठी 26 वेळा पत्र लिहिले. जिल्हाधिकारी, तहसीलदार फक्त हो म्हणतात, कारवाई करीत नाही. वाळू माफियांना हे अधिकारी घाबरत आहेत. कारण त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात.

Eknath Khadse On Mahayuti Govt
Pune Zilla Parishad : राज्य सरकारने तब्बल 29 वर्षांनी बदललेल्या 'त्या' निर्णयामुळे जिल्हा परिषदेला 7 स्वीकृत सदस्य मिळणार

जळगाव जिल्ह्यात नाना भाई प्रसिद्ध आहे. नाना भाई म्हणजे हप्ते खोरी. खालच्या कर्मचाऱ्यांपासून तर वरपर्यंत सगळीकडे हप्ते पोहोचविले जातात. त्या हप्ते खोरीवर सरकार दबले आहे. त्यामुळे वाळूमाफियांचा दबाव सर्व यंत्रणांवर आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला.

महसूल मंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अवैध वाळू उपसा थांबवावा यासाठी प्रयत्न केले. थेट घटनास्थळी जाऊन लाईव्ह लोकेशन दिले. मात्र तरीही कारवाई का होत नाही असा गंभीर प्रश्न खडसे यांनी केला. वाळू उपसा विषयावरून खडसे यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा उल्लेख झाला.

Eknath Khadse On Mahayuti Govt
Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोर प्रश्नावर अनिल परबांचे किरीट्ट सोमय्यांना चॅलेंज; 'ते' विशेष पथक कुठे गेले? गृहराज्यमंत्र्यावरही निशाणा

जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी भाजप आणि खडसे यांच्यात जोरदार राजकीय खडाजंगी सुरू आहे. यामध्ये अवैध खनिज कर आणि वाळू उपसा हा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या या राजकारणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले आहेत. त्यामुळे खडसे विरुद्ध सरकार असा कलगीतुरा रंगला आहे. अधिवेशन काळात त्यावरून पुन्हा एकदा जळगावचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com