CM Devendra Fadanvis & Sadhus Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Politics: नाशिक की त्रंबकेश्वर? कुंभमेळ्या आधीच साधूंमध्ये रंगतोय आखाडा!

Kumbh Mela;The debate over whether Kumbh Mela will be held in Nashik or Trimbakeshwar has flared up again-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शैव आखाड्यांनी केलेल्या मागणीने प्रशासनाची झाली कोंडी?

Sampat Devgire

Kumbh Mela news: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सिंहस्थाचा आढावा घेतला. यावेळी त्रंबकेश्वर येथील आखाड्यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख होताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा संयुक्त उल्लेख करण्याची मागणी केली. या मागणीने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिकचा की त्रंबकेश्वरचा हा वाद गेल्या काही कुंभमेळ्यांमध्ये सातत्याने चर्चेत राहिला आहे. गेल्या कुंभमेळ्यातही खरा कुंभमेळा त्रंबकेश्वरचाच असा दावा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंडालेश्वर नरेंद्रगिरी महाराज यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी विविध दावे देखील केले होते. आता त्याला नव्याने फोडणी मिळाली आहे.

नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशातील अन्य कुंभमेळ्यांच्या तुलनेत वेगळा आहे. त्याचे वेगळेपण म्हणजे वैष्णव साधूंचे तीन आखाडे नाशिकला शाही स्नान करतात. शैवांचे दहा आखाड्यांचे स्नान त्र्यंबकेश्वरला होते. एकाच वेळी दोन ठिकाणी होणारे शाही स्नान असे नाशिकच्या कुंभमेळ्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातडे ही मागणी झाली.

नाशिकचा कुंभमेळा जवळपास ५०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात होतो. त्या तुलनेत त्र्यंबकेश्वरला यंदा देखील १५ किलोमीटर आवारातच साधूग्राम उभारले जाणार आहे. यावरून कोणता कुंभमेळा भव्य हे बोलके आहे. कुंभमेळ्यातील रामकुंड (नाशिक) आणि कुशावर्त (त्र्यंबकेश्वर) अशा दोन ठिकाणी शाही स्नान होते. यामध्ये दोन शाहीस्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकाच वेळी होतात. तिसरे शाही स्नान मात्र दोन वेगवेगळ्या तारखांना होते. त्यामुळे हा वाद चर्चेत असतो.

या संदर्भात महामंडलेश्वर शंकरानंद गिरी महाराज यांनी शैव पंथाचे दहा आखाडे त्र्यंबकेश्वरला आहेत. नागा साधूंचा सर्वात मोठा जुना आखाडा देखील त्र्यंबकेश्वरलाच आहे. नाशिकला वैष्णव पंथांचे केवळ तीन आखाडे असतात. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा फक्त नाशिक असा न होता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असाच झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

ही त्र्यंबकेश्वरच्या साधूंची भूमिका असल्याने त्याला तातडीने विरोध देखील झाला आहे. नाशिकच्या स्थानिक आखाड्यांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे गेल्या विविध संस्थांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात रंगणारा वाद यंदा कुंभमेळा आधीच रंगला आहे. प्रशासनासाठी देखील ती डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी हा विषय आमचा नाही. संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ पातळीवर अर्थात राज्य शासनाच्या स्तरावर होईल, असे सांगून आपले हात झटकले आहेत. त्यामुळे नाशिक की त्रंबकेश्वर किंवा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर यापैकी कुंभमेळा कुठला यावर कुंभमेळ्याच्या खूप आधीच चर्चा रंगली आहे. त्यात आखाडा परिषद काय हस्तक्षेप करते याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT