Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar News: मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यावर आमदार कोकाटे यांनीही मागणी केली!

सरकारनामा ब्युरो

अजित देसाई

Scarcity in Nashik : जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतीत पेरण्या झालेल्या नाही. शेतकरी विहीरींचे पाणी देखील पिण्यासाठी जपून ठेवत आहेत. मात्र त्या त्या मतदारसंघांतील आमदारांनी या प्रश्नाबाबत भूमिका घेतलेली नाही. अद्याप आमदार कोकाटे वगळता टंचाईग्रस्त व हवालदील जनतेच्या मदतीसाठी पुढे आलेले नाही. (As there no raining the Nashik District, the Farmers are distressed)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर, (Sinner) नांदगाव, चांदवड, येवला (Yeola) यांसह काही तालुक्यांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. परंतु राजकीय नेते, आमदार त्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, बागलाण, मालेगाव आणि कळवण या तालुक्यांमध्ये अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे यावर्षी खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन श्री. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली. राज्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस पडलेला असताना नाशिक आणि नगर जिल्ह्यात मात्र विषम परिस्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अद्याप खरीपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील येत्या काळात भेडसावणार आहे.

परिस्थितीचा आढावा घेऊन तेथे दुष्काळ जाहीर करावा. जनावरांसाठी चारा डेपो, छावण्या, पाणी उपलब्ध करून द्यावे. गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टँकर सुरू करावेत. शेतकऱ्यांना विज बिल माफीकर्जमाफी द्यावी. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. यासह दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी आमदार कोकाटे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT