Uddhav Thackeray News : गद्दार हेमंत गोडसे यांना धूळ चारा!

Teach a lesson to shivsena traitors in Nashik-मतदारसंघाचा आढावा घेताना शिवसेना पदाधिकाऱ्यांना कठोर होण्याचे आवाहन केले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Loksabha election News : काँग्रेस, भाजपपाठोपाठ शिवसेनेने देखील लोकसभा निवडणुकीचा अतिशय गांभीर्याने आढावा घेण्यास सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त करीत नाशिकमधील गद्दारांना आणि खासदार हेमंत गोडसे यांना धडा शिकवा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. (Shivsena take a political review for the loksabha election)

शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सहकारी पक्षांच्या राजकीय संकेतांची वाट न पाहता जिल्ह्यातील नाशिक (Nashik) व दिंडोरी (Dindori) या दोन्ही मतदारसंघांत लोकसभेसाठी चाचपणी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढावा घेतला.

Uddhav Thackeray
ACB Trap News : नडलेल्या कर्जदाराकडून घेतली ५ लाखांची लाच!

यावेळी ठाकरे म्हणाले, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह नाशिकमध्ये मिंधे सेनेत ज्यांनी प्रवेश केला त्यांना शिवसेनेने सर्व काही दिले होते. असे असतानाही त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली. त्यामुळे गोडसे यांच्यासह गद्दारांना कोणत्याही स्थितीत धूळ चारून नाशिक लोकसभा जिंका.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्याकडून लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकायांच्या बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मातोश्री येथे बैठक घेतली, त्यावेळी ठाकरे यांनी लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray यांच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर | BJP | Shivsena | Devendra Fadnavis

ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरायचे आहे. त्यामुळे काही जागांवर तडजोड करावी लागेल. त्याअनुषंगाने नेते, कार्यकर्त्यांनी मानसिक तयारी ठेवावी लागेल. पक्षात फूट पडल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची किती ताकद आहे ? याचा आढावा घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागावे, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुख त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकद लाऊन उमेदवार निवडून आणावा, काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्याची तयारी ठेवा. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. उमेदवार निवडून आणायचाच असा निर्धार प्रत्येकाने करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray
Dhule Politics : धुळ्यातही भाजपविरोधात ‘इंडिया’ गटाची आक्रमक एकजूट!

संपर्कनेते संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, अद्वय हिरे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, जयंत दिंडे, गणेश धात्रक यांच्यासह तालुकानिहाय संपर्क प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com