Lok Sabha 2024- चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील, रक्षा खडसे Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha 2024 : चंद्रशेखर बावनकुळेंचे रावेर लोकसभेत ‘डॅमेंज कंट्रोल; नाराज चंद्रकात पाटील झाले अॅक्टिव्ह

कैलास शिंदे

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयाची हॅटट्रीक साधण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी एकनाथ खडसे यांच्याशी असलेल्या विरोधामुळे रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.

परंतु, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगरात जावून आमदार पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली असून आता ते प्रचारात Election Campaign सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. BJP Politics Lok Sabha Election 2024 North Maharashtra Raver Constituency

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार श्रीमती रक्षा खडसे Raksha Khadse विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देवून सून रक्षा खडसे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भाजपतील BJP प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्या तरी त्याची प्रक्रिया कधी होईल याबाबत साशंकता आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्राकडे अंगुलीनिर्देश केले आहे. परंतु, तरीही एकनाथ खडसे यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे पक्षासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. परंतु याच मतदारसंघातील मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महायुतीत आहेत.

परंतु, त्यांनीही एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय वाद असल्यामुळे श्रीमती रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. आमदार पाटील यांच्या या निर्णयामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघात फटका बसण्याची शक्यता होती.

हे देखिल वाचा

भाजपला आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज मुक्ताईनगरात दाखल झाले, त्यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.आणि त्यांच्याशी चर्चा केली.

पत्रकारांशी बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांच्यात स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. मनभेद नाहीत; मात्र या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देशाचा विकास करावयाचा आहे. त्यासाठी मतभेद विसरून प्रचारास सहभागी होण्याचे आपण आमदार चंद्रकांत पाटील यांना आवाहन केले आहे.

आमदार पाटील यांनीही त्याला प्रतिसाद दिला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला साथ देण्यासाठी, आमदार पाटील यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करून मुक्ताईनगरातून मोठा लीड देण्याबाबत आश्‍वासीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे देखिल वाचा-

रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे आमदार चंद्रकांत पाटील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात नसल्यामुळे अनेक चर्चा होत होत्या, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: मुक्ताईनगरात येवून आमदार चंद्रकांत पाटील यांचे मनातील शंका दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले. रावेर लोकसभा मतदार संघात असलेला मोठा ‘डॅमेज कंट्रोल’ त्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मनोमिलन झाले कि नाही हे दिसून येईल,परंतु सद्या तरी आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजप उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी सहमती असल्याचे दिसून येत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT