Sushma Andhare : '...म्हणून चित्रा वाघांना पॉर्न फिल्ममधील पात्रांचा चांगला परिचय'; सुषमा अंधारेंचा पलटवार

Chitra Wagh Vs Uddhav Thackeray : चित्रा वाघ या जाहिरातीमध्ये असलेल्या कलाकाराचा अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत आहेत. तो कलाकार वेब सिरीजमधील कलाकार आहे. याप्रकारे त्यांची बदनामी होत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे
Sushma Andhare, Chitra Wagh
Sushma Andhare, Chitra WaghSarkarnama

Pune Political News : शिवसेना ठाकरे गटच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारने अभिनय केल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना अंधारे म्हणाल्या, भाजपच्या अक्रस्ताळ्या महिला नेत्यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला आहे. आणि आमच्या पक्षाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. कोण पॉर्नस्टार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही कारण आम्ही अशा प्रकारच्या फिल्म पाहत नाही. मात्र भाजपाच्या त्या महिला नेत्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे त्यांना या फिल्म मधल्या पात्रांचा परिचय आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला.

एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असतो. त्यामध्ये तो वेगवेगळे सीन करत असतो. मात्र त्या कलाकाराच्या कलाकारीवर आक्षेपच घ्यायचा असेल तर मग नवनीत राणा यांचे आधीची गाणी आणि आता त्यांना देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत भाजप व त्यांच्या नेत्यांचे काय म्हणणे आहे, असा प्रश्नही उपस्थित करत अंधारेंनी वाघ यांना धारेवर धरले.

चित्रा वाघ या महिलांच्या प्रश्नांवरती सोयीस्कर भूमिका घेताना दिसत आहेत. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेवर त्या गप्प बसतात. प्रज्वल रेवण्णा आणि सोमय्या या भाजप नेत्याचे जे व्हिडीओ समोर आले आहेत, त्याबाबत चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare, Chitra Wagh
Uddhav Thackeray : केजरीवालांचे नाव घेत भाजप नेत्याचा ठाकरेंना गंभीर इशारा; म्हणाले...

चित्रा वाघ या जाहिरातीमध्ये असलेल्या कलाकाराचा अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत आहेत. तो कलाकार वेब सिरीजमधील कलाकार आहे. याप्रकारे त्यांची बदनामी होत असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारचे आक्षेप घेण्यापूर्वी कंगना रानौत, मनोज तिवारी, नवनीत राणा यांच्याबाबत भाजपची काय भूमिका आहे, हे पहिले त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही अंधारेंनी केले आहे.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे करत आहेत. हा पॉर्नस्टार जाहिरातीमध्ये विचारतो की, 'महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?' हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलींबरोबर अश्लिल चित्रण करतो."

या पॉर्न स्टारचे एका अ‍ॅपवरती मुलींबरोबर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडीओ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणाची? त्याच्या कंपनीचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे?" असा प्रश्न चित्र वाघ यांनी विचारला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sushma Andhare, Chitra Wagh
Lok Sabha Election 2024 : 'साठ वर्ष भ्रमनिरास म्हणून लोकांची मोदींना साथ'; भाजप प्रवेशानंतर अर्चना पाटलांना साक्षात्कार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com