Radhakrishna Vikhe, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : शरद पवार, दहा जागा लढवणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष! मंत्री विखेंनी डिवचलं

Radhakrishna Vikhe News : भाजपचे स्टार प्रचारक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रचारात समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले. देशात समान नागरी कायद्याची नागरिकांची मागणी आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजपचे स्टार प्रचारक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले. देशात समान नागरी कायद्याची नागरिकांची मागणी आहे. यासाठी 13 तारखेला मतदान करून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन मंत्री विखेंनी केले. शरद पवार दहा जागा लढवणार्‍या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच शिल्लक राहिला नसल्याची टीकाही मंत्री विखे यांनी केली आहे.

भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा गाडा ओढताना दिसत आहे. मंत्री विखे यांनी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पायाला भिंगरी लावली आहे. दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख शहरांमध्ये स्वतः हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंत्री विखेंचे पुत्र खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) दुसर्‍यांदा भाजपचे उमेदवार आहे. हा मतदारसंघ मंत्री विखे यांनी पिंजून काढत आहेत. महायुतीतील सर्व पक्षांना बरोबर घेण्याची कसरत विखे पिता-पुत्र साधत आहेत. मंत्री विखे यांनी अहमदनगर कॅंटोन्मेंट परिसरातील भिंगार शहरातील सभेत समान नागरी कायद्यावर मोठे भाष्य केले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून देशाच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधक टार्गेट करताना दिसत आहेत. शरद पवार लोकसभेच्या दहा जागा लढवणार्‍या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच नाही. ही मंडळी देशाला स्थिरता देऊ शकत नाही.

मोदींच्या हाती सत्ता दिली, म्हणजे देश सुरक्षित राहील. समान नागरी कायदा करण्यासाठी देशातील नागरिकांची मागणी असून, येत्या 13 तारखेला शिक्कामोर्तब करायचे आहे. देशात आपलेच सरकार येणार आहे. प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. खासदार सुजय विखे यांना मतदान करणारे हिंदुत्वाला आणि नरेंद्र मोदी यांना असेल. लोकसभेची निवडणूक ही महापालिका, कँटाेन्मेंटची नसून देशाची सुरक्षा कोणाच्या हाती द्यायची आहे याची आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

शिवसेनेचे अनिलभैया नगर शहरातील प्रचाराच्या केंद्रस्थानी

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड नगर शहरात प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराकडून अनिलभैया यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी भर सभेत अनिलभैयांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनादेखील अनिलभैयांची उणीव जाणवते, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार विखेंसाठी नगर शहरातून प्रचार फेरी काढली. ही प्रचार फेरी शिवालयाजवळ पोहोचली असताना, प्रचार फेरीतील भाजप कार्यकर्त्यांनी अनिलभैयांच्या नावानं जयघोष केला. शिवसेना फुटल्यानंतर नगरच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या गटाला पसंती दिली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT