Nana Bacchav, Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Nana Bachhav News : मराठा समाज लोकसभा निवडणुकीत करणार भाजपची कोंडी!

Sampat Devgire

Manoj Jarange- Patil Politics: आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. त्यासाठी नाशिकमधून अडीचशेहून अधिक कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे नाशिकची निवडणूकदेखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला. अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. या प्रश्नाबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊनदेखील प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रामुख्याने समाजाचा राग आहे. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये उमटलेले दिसतील, असे सकल मराठा समाजाचे समन्वयक नाना बच्छाव यांनी सांगितले.Latest Marathi News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक शहरातील 50 वैद्यकीय व्यावसायिक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले 200 हून अधिक नागरिकदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या संदर्भात येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. या वेळीदेखील विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान साडेतीनशे जण उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाला Maratha Reservation आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. उलट मनोज जरांगे- पाटील Manoj Jarange patil यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे सर्व मराठा आरक्षणाचे नेते जरांगे- पाटील यांना अडचणीत आणण्याचे डावपेच आहेत. राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध समाजामध्ये आक्रोश आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यातून मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न असेल.

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू आहे. विविध राजकीय पक्ष सध्या जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहेत. अशा स्थितीत सकल मराठा समाजदेखील यानिमित्ताने आरक्षणाची आपली मागणी पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मतदानावर किती प्रभाव टाकतो याची उत्सुकता वाढली आहे. नाशिक मतदारसंघातदेखील तशी जोरदार तयारी सुरू झाल्याचे दिसते. (Maratha reservation supporters BJP Nashik)

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT