Manoj Jarange Patil News : लोकसभा निवडणुकीबाबत भुजबळांनी जरांगेंना 'का' डिवचले?

Maratha Reservation Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांना लक्ष्य केले आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा डिवचले.
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Sarkarnama

Chhagan Bhujbal Vs Jarange Patil : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांना लक्ष्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत भुजबळ यांनी हे विधान केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक मतदान यंत्रावरून बॅलेट पेपरवर आणण्यासाठी मराठा आंदोलक प्रयत्नशील आहेत. या संदर्भात मराठा आरक्षण आंदोलनातील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करावेत. त्यामुळे मतदान यंत्राऐवजी मतदान पत्रिकेवर घ्यावे लागेल, असा हा प्रयत्न आहे. त्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुका ( Loksabha Election 2024 ) ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत बाधा येईल, असे काम मराठा आंदोलकांनी करू नये. त्याचा लोकशाही प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल. कारण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील. हा फक्त मतदान यंत्राचा प्रश्न नाही. त्यात अनेक गंभीर विषय आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणे हा एवढा सोपा विषय राहिलेला नाही.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात मनसे? नाशिकमध्ये चाचपणी; वर्धापनदिनी राज ठाकरे भूमिका जाहीर करणार?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे समर्थक प्रत्येक मतदारसंघात पाचशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जाते. असे घडल्यास तेवढ्या उमेदवारांना अर्ज भरणे हे सोपे नाही. त्यासाठी तेवढे वकीलदेखील लागतील या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येईल. हा खर्च कोण करेल हे कितपत योग्य आहे. हे मला सांगता येणार नाही. मात्र, असे करणे म्हणजे आपल्या मागणीसाठी लोकशाही व निवडणुकीच्या ( Election ) प्रक्रियेत अडथळा आणणे हे आहे, असे भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते जरांगे पाटील आणि ( Chhagan Bhujbal ) भुजबळ हे सातत्याने एकमेकांवर टीका करीत असतात. विशेषतः भुजबळ यांनी यापूर्वी केलेल्या टीकेमुळे ते मराठा आंदोलकांच्या रडारवर आलेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांनी जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना टीका करून वाचण्याचा प्रयत्न केला आहे.

R

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरीवर राष्ट्रवादीने ठोकला दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com