Rahul Gandhi News : राहुल गांधींनी नंदूरबारमध्ये जाऊन विजयकुमार गावित यांचे वाभाडे काढले!

Nandurbar Congress काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेचा आज नंदूरबार येथे प्रवेश झाला. या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अतिशय जल्लोषात आणि हजारो आदिवासींच्या उपस्थितीत स्वागत झाले.
Rahul Gandhi, Vijaykumar Gavit
Rahul Gandhi, Vijaykumar Gavitsarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi challenged BJP : जवळपास गेली दहा वर्षे राज्याचे आदिवासी विकासमंत्री असलेले विजयकुमार गावित यांच्या मतदारसंघात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रचंड स्वागत झाले. या वेळी राहुल गांधी यांनी गावित यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण केला. आदिवासींना त्यांचे हक्क काँग्रेस मिळवून देणार, असा दावा राहुल गांधी यांनी या वेळी केला.

काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेचा आज नंदूरबार येथे महाराष्ट्रात प्रवेश झाला. या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अतिशय जल्लोषात आणि हजारो आदिवासींच्या उपस्थितीत स्वागत झाले. या वेळी काँग्रेसचे राज्यातील विविध नेते उपस्थित होते. माजी मंत्री जयराम रमेश, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री केसी पाडवी, रमेश चेन्नीथाला आदी नेते उपस्थित हाेते.

स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील जल्लोष पाहण्यासारखा होता. या वेळी राहुल गांधी यांनी भाजपचा अजेंडा असलेला 'वनवासी', वन जमिनीचे प्रलंबित दावे, पेसा कायदा, आदिवासींच्या अधिकार, जातीय जनगणना यांसारखे गंभीर विषय उपस्थित केले. भाजप आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणत आहे. त्यांच्या हक्क आणि अधिकारांवर भाजप अतिक्रमण करीत आहे. वन जमिनीचे कायदे कमजोर केले जात आहेत.

Rahul Gandhi, Vijaykumar Gavit
Congress News : भारत जोडो यात्रा भाजपच्या ध्रुवीकरणाला बूस्टर डोस... जयराम रमेश

आदिवासींना न्याय देण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष अतिशय हिरिरीने लढणार आहे. सत्तेत येताच वनजमिनींचे दावे तत्काळ निकाली काढणार, असे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर अतिशय धारदार शब्दांत हल्ला केला. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यापासून त्यांनी गरीब आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या हक्कावर आक्रमण केले आहे. ज्यांना गरज नाही, अशा लोकांना कर्जमाफी दिली जाते.

भाजपने अती श्रीमंतांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. देशात अंबानी अदानी यांच्यासारख्या २२ लोकांकडे जेवढे धन आहे, तेवढे ७० कोटी लोकांकडेदेखील नाही. संपूर्ण देश 22 लोकांच्या हातात गेला आहे. देशातील माध्यमांच्या कंपन्यांच्या मालकांची यादी काढा त्यांच्या अँकरची यादी काढा. तुम्हाला कोणी आदिवासी पत्रकार दिसलाय का?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. असे धोरण राबविणारा पक्ष आणि सरकार कोणाचे भले करणार आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi, Vijaykumar Gavit
Ajit pawar Visit Nandurbar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे एका दगडात दोन पक्षी; गावित विरोधकांना बळ, काँग्रेसलाही खिंडार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडाे यात्रेचे नंदूरबारला आगमन झाले. उद्या ते धुळे जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. १४ मार्चला नाशिक जिल्ह्यात राहुल गांधी यांची सभा आणि रोड शो होतील. महाविकास आघाडीचे घटक पक्ष व त्यांचे नेतेदेखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची आक्रमक भाषा राहुल गांधी यांनी आदिवासी भागातील या दौऱ्यात केली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी राजकीय संघर्षाची चिन्हे आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Rahul Gandhi, Vijaykumar Gavit
Rahul Gandhi Adivasi Nyaya Yatra: 14 वर्षांनंतर गांधी घराण्याचा सदस्य नंदुरबारमध्ये; आदिवासींसाठी काँग्रेसची नवी खेळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com