Hemant Godse, Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency 2024 : उमेदवारीवर पाणी सोडावे लागलेले भुजबळ गोडसेंचा प्रचार करणार

Lok Sabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Constituency 2024) महायुतीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ प्रमुख इच्छुक होते. त्यांची स्पर्धा प्रामुख्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याशी होती. या स्पर्धेत गोडसे यांनी बाजी मारत भुजबळांची उमेदवारी अक्षरशा हिसकावली. आता तेच गोडसे भुजबळांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी सरसावले आहेत.

शिवसेनेचे उमेदवार खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यात प्रचार याबाबत अद्याप फारसा समन्वय नाही, असे बोलले जाते. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.

शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील. त्यानंतर सहकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रचारातील समन्वय याबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे शिंदे यांचा दौरा तसेच आजच्या घडामोडी याने खासदार गोडसे यांच्या प्रचाराला गती मिळण्याची चिन्हे आहेत. (Lok Sabha Election 2024)

यापार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. यावेळी विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते. निवडणूक प्रचाराबाबत यावेळी चर्चा झाली. महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सर्व गोडसे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. ते बोलावतील तेव्हा किंवा आयोजित केलेल्या सभेला देखील मी हजर राहणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यापूर्वीच प्रचारात सक्रिय झाले आहेत, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघात 2014 ला छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा मोठ्या फरकाने गोडसे यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात गोडसे उमेदवार होते. त्या निवडणुकीत देखील गोडसे यांनी भुजबळ यांचा पराभव केला होता.

यंदाच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षांतील बंडखोरीमुळे मंत्री भुजबळ हेच आता महायुतीचा भाग बनले आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर दोनदा निवडणुकीत पराभूत केलेल्या आणि तिसऱ्यांदा मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी हिसकावण्यात यशस्वी झालेल्या खासदार गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ यांना सहभागी व्हावे लागणार आहे.

या संदर्भात खासदार गोडसे यांनी महायुतीचे ज्येष्ठ नेते असल्याने आपण भुजबळ यांचे भेट घेतल्याचे सांगितले. त्यांनी देखील निवडणूक प्रचारासाठी आशीर्वाद दिले आहेत. महायुतीमध्ये भुजबळ सहभागी झाले असल्याने मोठी ताकद मिळणार आहे. त्या बळावर निश्चितच येत्या निवडणुकीत आपण यशस्वी होऊ, असा दावा गोडसेंनी केला.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT