Devendra Fadnavis News: ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सभेतच 'बत्ती गुल'; अंधारातच ठोकलं धडाकेबाज भाषण

Loksabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

Bhusawal Sabha News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजप लोकसभा निवडणुकीतील महायुतीसह भाजप उमेदवारांच्या प्रचारात प्रचंड व्यस्त आहेत.त्यांच्या कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी,कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तर स्वतंत्र सभा घेत झंझावाती प्रचार अन् दौरे सुरू आहेत. त्यांच्या तुफानी भाषणातून ते विरोधकांवर टीकेची तोफ डागत नाही.

Devendra Fadnavis
Fadnavis and Vikhe News : बाळासाहेब विखेंचे स्वप्न पूर्ण करण्याची फडणवीसांची ग्वाही!

याचदरम्यान,आता भुसावळ येथे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री असलेल्या फडणवीसांच्या भाषणावेळीच वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी त्यांनी अंधारातच आपले धडाकेबाज भाषण सुरू ठेवले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरु ठेवल्या.फडणवीसांच्या या भाषणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नसताना ते स्नुषा व भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारात उतरले आहेत. अशातच रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी (ता.७) भुसावळ येथे सभा झाली.

Devendra Fadnavis
Dharashiv Lok Sabha News : तहान-भूक विसरलेल्यांना आराम; तरीही महिनाभर धडधड कायम...

आपला करंट असा आहे

सभेत भाषण करताना बत्तीगुल झाली मात्र आपले धडाकेबाज भाषण न थांबवता फडणवीस म्हणाले, विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आपला करंटच असा आहे आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. बत्ती गुल झाल्याने सभास्थळी असलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाईलचा टाॅर्च चालू केल्या. भरअंधारात एकदम इतक्या टाॅर्च लागलेल्या पाहून फडणवीस म्हणाले, काय सुंदर दृक्ष आहे पहा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com