Eknath Shinde, Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse News : मुख्यमंत्री 'नॉट रिचेबल', भाजप अन् राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा; नाराज गोडसेंनी मात्र...

Sampat Devgire

महायुतीकडून नाशिक मतदारसंघाचा ( Nashik Lok Sabha Election 2024 ) तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. उमेदवारीसाठी ताटकळणाऱ्या हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेटही मिळाली नाही. त्यामुळे ते नाशिकला परतल्याने नाशिकच्या जागेचे गुढ वाढले आहे.

नाशिक मतदार संघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) उमेदवारीसाठी जोरदार फील्डिंग लावून आहेत. सध्या पक्षाचे पदाधिकारी ही त्यांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र आहे. मात्र, गेले तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळणाऱ्या खासदार गोडसे यांना मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी भेट टाळली. त्यामुळे नाराज हेमंत गोडसे आता नाशिकला परतले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघाच्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. त्यात शिथीलता आली तर लगेच भाजप डोके वर काढत असल्यामुळे नाशिक मतदारसंघ कधी नव्हे तो एवढा प्रतिष्ठेचा बनला आहे. या सर्व वादाला शनिवारी खासदार गोडसे यांनी नवीन ट्वीस्ट दिला. त्यांनी आपल्या समर्थकांसह शहराच्या शालीमार येथील हनुमान मंदिरात महाआरती करून शक्ती प्रदर्शन केले. हे शक्ती प्रदर्शन विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) यांच्याऐवजी सहकारी पक्षातील इच्छुक व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यासाठी होते.

खासदार गोडसे यांनी केलेल्या महाआरतीच्या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष बंटी तिदमे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांसह सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. तर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि खासदार गोडसे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी गोडसे यांनी लोकसभा निवडणुकीचे पत्रक देखील तयार केले होते. या पत्रकाचे वितरण शहरात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारी अनिश्चित असताना आणि मुख्यमंत्री नॉट रिचेबल असताना खासदार गोडसे यांनी मात्र प्रचार सुरू केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

यावेळी खासदार गोडसे यांनी नाशिक मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेले राजकारण चुकीचे आहे. यामध्ये अन्य पक्षांनी केलेल्या दावा खेदजनक असल्याचे सांगितले. "आम्ही गेल्या पाच वर्षात मतदार संघात प्रचंड कामे केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही संपर्क दौरा सुरू केलेला आहे. आम्ही प्रचार सुरू केला नाही. शिवसेना एकनाथ शिंदे गटाची कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकची जागा आपल्या पक्षाकडेच ठेवतील. आम्हाला न्याय देतील," असा दावा खासदार गोडसे यांनी केला.

एकंदरच गेले काही दिवस महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा करून गोंधळ उडवून दिला आहे. या गोंधळात प्रचाराची सुरुवात करून खासदार गोडसे यांनी अधिक भर टाकली. त्यामुळे विरोधकांऐवजी महायुतीचे नेते आणि घटक पक्ष परस्परांशीच लढण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT