sharad pawar cpim sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'माकप'ला हवी शरद पवारांनी उमेदवार जाहीर केलेली जागा?आघाडीत खदखद सुरूच...

Dindori Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sampat Devgire

Nashik News : दिंडोरी मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत उमेदवारीबाबत खदखद कायम आहे. 'सीपीएम'ने या जागेवरील आपला हक्क अद्यापही सोडलेला नाही. हा मतदारसंघ मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाआघाडीत जागावाटपावरून अजूनही धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीला कार्यकारिणीचे सर्व 41 सदस्य उपस्थित होते. बराच वेळ चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय आढावा घेण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचा घटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी प्रामुख्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पराभूत करील, असा प्रभावी उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, या मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे अद्यापही बऱ्याच कालावधी आहे. या कालावधीत राजकीय फेरआढावा घेण्यात येईल. त्यानंतर उमेदवारीचा फेरविचार करावा, असा पर्याय महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांना देण्यात येणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) नेते मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून उमेदवार द्यावा अथवा नाही, याची चाचपणी करण्यात येणार आहे. या मतदारसंघात डाव्या पक्षांचा चांगला प्रभाव आहे. त्या दृष्टीने भाजपचा पराभव करील अशाच उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीने कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव करणे हे आहे. त्या दृष्टीने सक्षम पर्याय महाविकास आघाडीने दिले पाहिजेत. कमकुवत यंत्रणा आणि उमेदवाराचा लाभ भाजपच्या उमेदवाराला मिळू नये, हा विचार प्राधान्याने करावा असे ठरले. या बैठकीस राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT