Unmesh Patil
Unmesh PatilSarkarnama

Unmesh Patil : भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंना देणार साथ ?

जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली आहे.
Published on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता नवीन माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत आहेत. भाजपचे (BJP) युवा नेते पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करन पवार त्यांच्या सोबत आहेत. पवार यांना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. loksabha Election 2024

Unmesh Patil
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

पवार व पाटील हे मित्र आहेत. आपल्या मित्रासाठी आता खासदार पाटील हे सरसावणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळें आता दोघेही आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

खासदार उन्मेष पाटील व करन पवार यांच्या भाजप सोडल्यामुळे तसेच करन पवार यांचे ठाकरे गटाच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे समीकरण बिघडणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर भाजप काय चाल खेळणार याकडेच लक्ष असणार आहे.

R

Unmesh Patil
Nashik Lok Sabha Constituency : नाशकात महायुतीचं ठरलं; छगन भुजबळ भिडणार ठाकरे गटाच्या वाजेंना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com