subhash bhamre sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Subhash Bhamre News : सुभाष भामरे यांच्या 'हॅट्ट्रिक'मध्ये बागलाण मतदारसंघाचा मोठा अडसर?

Baglan Assembly Constituency : बागलाण मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत मानला जातो. शेतकरी चळवळीचा मोठा वारसा या मतदारसंघाला आहे.

Sampat Devgire

Subhash Bhamre Vs Shobha Bacchav : धुळे लोकसभा मतदारसंघात ( Dhule Lok Sabha Constituency ) भाजपचे डॉ. सुभाष भामरे यंदा हॅट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचारात स्वतःला अक्षरशा झोकून दिले होते. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचा भाग असलेल्या बागलानचे मोठे महत्त्व आहे. धुळे मतदारसंघात महायुतीचे डॉ. भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ सामना आहे. विशेष म्हणजे यंदा वंचित बहुजन आघाडीसह अन्य कोणताही पक्ष मैदानात नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत यंदा बच्छाव विरुद्ध भामरे अशी थेट लढत आहे. विविध स्थानिक प्रश्नांभोवती या निवडणुकीचा प्रचार झालेला आहे. यामध्ये बागलाण विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची स्थिती आहे.

बागलाण मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत मानला जातो. शेतकरी चळवळीचा मोठा वारसा या मतदारसंघाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे कांदा निर्यात बंदी आणि शेतमालाला पुरेसे भाव नसल्याने मोठे आंदोलन झाले. राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्याने केंद्र सरकार विरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष यानिमित्ताने राजकीय मुद्दा बनला. त्यातच भाजपचे डॉ. भामरे ( Subhash Bhamre ) यांच्याविषयी अनेक तक्रारी देखील होत्या. त्यामुळे भाजपला प्रचारात बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघात यंदा 64.25 टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेत थोडेसे अधिक आहे. 2019 मध्ये या मतदारसंघातून डॉ. भामरे यांना मोदी लाटेच्या प्रभावात एक लाख 17 हजार 954 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्यापेक्षा भामरे यांना बहात्तर हजार 253 मतांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत देखील काँग्रेसची फारशी यंत्रणा येथे दिसून आली नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येथे जोरकसपणे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी महाविकास आघाडीची बाजू लावून धरली. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा लाभ घेत डॉ. बच्छाव ( Shobha Bacchav ) यांनी वातावरण उभे करण्यात यश मिळविले होते. त्यातून त्यांना किती मते मिळतात हा उत्सुकतेचा विषय आहे. एकंदरच डॉ. भामरे यांची आघाडी किती कमी होते याची उत्सुकता आहे.

गेल्या दहा वर्षात बागलाण परिसरात भाजपचे डॉक्टर भामरे यांनी केलेल्या कामकाजासह केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत आणण्यासाठी भाजप प्रचार करीत होता त्यांच्या विरोधात कांदा निर्यात बंदी आणि राज्यघटनेच्या सुरक्षिततेसह अन्य मुद्द्यांवर विरोधकांनी भर दिला होता. अगदी मतदानाला देखील विरोधक कांद्याच्या माळा घालून गेले होते. या निमित्ताने शेतकरी विरोधी वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

मुख्यतः भाजपचे आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्यात ही लढत होती. त्याला आगामी विधानसभा निवडणुकीचे संदर्भ आहेत. नाशिक जिल्ह्यातील बागलाण विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यादेखील नाशिकच्या आहे. अशा स्थितीत मतदार कोणाला कौल देतात आणि भाजपची आघाडी किती प्रमाणात टिकून राहते एवढाच या निवडणुकीतील चर्चेचा विषय आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT