eknath khadse raksha khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : खडसेंनी रावेरमध्ये डमी उमेदवार देऊन राष्ट्रवादीचा बळी घेतला!

Mla Chandrakant Patil On Eknath Khadse : अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला.

Sampat Devgire

जळगाव : 16 मार्च | एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघात ( Raver Lok Sabha Election 2024 ) भाजपला बाय दिला आहे. रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांच्या विरोधात खडसेंनी डमी उमेदवार दिला. त्यांनी कौटुंबिक स्वार्थासाठी राष्ट्रवादीचा बळी घेतला, असा घणाघाती आरोप शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

रावेर मतदारसंघातील महायुतीला पाठिंबा दिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात स्वार्थासाठी पक्षाचा बळी देऊन खडसे यांनी तडजोड केली, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"रक्षा खडसेंचा प्रचार करायची की नाही ठरवणार"

"खडसे यांनी अतिशय नियोजनपूर्वक आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बळी दिला आहे. सध्याचे राजकारण प्रामाणिकपणे काम करणारे आणि विचारांवर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे राहिले नाही. दोन-तीन पक्षांवर निष्ठा ठेवून कुटुंब एकच आणि पक्ष अनेक, अशी स्थिती असलेल्या नेत्यांचे झाले आहे. त्यातून सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी महायुतीचा घटक असलो तरीही खडसे यांचा प्रचार करायचा की नाही हे वेळ आल्यावर ठरवेल. एकनाथ खडसे जेवढा राष्ट्रवादीचा प्रचार करतील, तेवढाच प्रचार मी महायुतीचा करेल," असा चिमटाही पाटलांनी खडसेंना काढला आहे.

"खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली"

"ज्या पद्धतीने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केले. त्यानंतर खडसे यांनी रावेर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी मागून घेतला. पण, त्याच पद्धतीनं स्वतः निवडणुकीतून माघार घेतली. हे अतिशय बोलके आहे. शरद पवार यांना हे मान्य आहे का? एकनाथ खडसे यांचे हे राजकीय कौशल्य म्हणायचे का? त्यामुळे सध्याची निवडणूक ही राष्ट्रवादीने भाजपला बाय दिल्यासारखे आहे, अशी ग्रामीण भागातील मतदारांची भावना झाली आहे," असं आमदार पाटलांनी सांगितलं.

"भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी खडसेंचा निर्णय"

"एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात आधी उमेदवारी मागून घेतली. त्यानंतर माघार घेतली. आता ते डमी उमेदवार देत आहेत. यावरून त्यांचे राजकारण सर्वकाही कुटुंबासाठी असे आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महायुतीचा अर्थात भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी घेतलेला हा उघड उघड निर्णय आहे," असा आरोपदेखील आमदार पाटील यांनी केला.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT