Eknath Shinde Group politics: नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील घटक पक्षांची नाराजी कमी होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्ष यावरून नाराज होता. आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही याबाबत शिंदे गटावर टीका केली आहे.
महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला किती जागा सोडायच्या याचे सूत्र यापूर्वीच चर्चेत होते. आता निवडणुकीची घोषणा तेव्हाही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर घटक पक्षांमध्ये जागा आणि उमेदवारीबाबतचा दबाव वाढू लागल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. कार्यकर्त्यांनी गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले होते. कार्यकर्त्यांनी त्याचे उत्साहात स्वागत केले. मात्र, अन्य सहकारी पक्ष त्यामुळे नाराज झाले.
या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकारच नाही. त्यांनी थोडा संयम दाखवायला हवा होता. याबाबतची घटक पक्षांतील चर्चा होण्याआधीच त्यांनी घोषणा केल्यामुळे अजित पवार गटाचे नेते भुजबळदेखील नाराज आहेत, असे स्पष्ट होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीदेखील शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे संताप व्यक्त केला आहे. भाजपकडून या मतदारसंघात विविध पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यातील काहींनी गेली वर्षभर निवडणुकीची तयारी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत काल रात्री उशिरापर्यंत स्थानिक पदाधिकारी आणि मंत्री महाजन यांच्यात विविध बैठका झाल्या. मात्र, त्यातून तोडगा निघालेला नाही. शुक्रवारी (ता.15) याबाबत सायंकाळी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या घोषणेने सहकारी पक्षात चांगलीच नाराजी पसरली आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी शिंदे गटाला परिश्रम घ्यावे लागतील.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.