Nagar News : भाजपचे खासदार सुजय विखेंना यांना शिवसेना काय आहे, हे दाखवून देण्याबरोबर नगर, शिर्डी आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा असणार आहे. यासाठी तीन वजनदार नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा रविवारी (ता. 28) मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी दिली.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मेळाव्याच्या नियोजनासाठी आमदार शिंदे (MLC Sunil Shinde) यांनी नगर शहरातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, स्मिता अष्टेकर उपस्थित होते.
आमदार शिंदे यांनी लोकसभेच्या (LokSabha) शिर्डी मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचा उमेदवार उभा होता. त्यामुळे ती जागा आमचीच आहे. याशिवाय दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागाही आम्ही महाविकास आघाडीकडे मागणार आहोत. नगर दक्षिणेतून लढण्यासाठी आमच्याकडे तीन वजनदार नावे आहेत. महायुती विरोधकांना टेन्शन देणारी ही नावे आहेत. आघाडीतील जागावाटपानंतर ती नावे जाहीर केली जातील, असे शिंदे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुजय विखे यांच्या साखरवाटपाच्या कार्यक्रमावरून त्यांच्या भूमिकेवर आमदार शिंदे यांनी टीका केली. खासदार विखेंना शिवेसना काय आहे, या निवडणुकीत कळेल. शिवसेना त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही आमदार शिंदे यांनी म्हटले. नगर दक्षिणसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट इच्छुक आहे. तशी चाचपणी झाली आहे. शिवसेनेच्या संपर्कात तीन वजनदार नेते आहेत. ते नगर दक्षिणमध्ये चांगली फाईट देऊ शकतात. शिवसेना त्यांना विजयदेखील मिळवून देऊ शकते, असेही आमदार शिंदे म्हणाले.
पक्षाचे उपनेते साजन पाचपुते हे पक्षात नवे असून, सध्या संघटनेचे कामकाज समजून घेत आहेत. त्यांच्यासह पक्षातील जे आमच्यासमवेत आहेत. त्या सर्वांवर आमचा विश्वास आहे. ते सर्व जण सक्षम आहेत व त्यांच्यावर भरवसाही आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. मागील दीड वर्षापासून माझ्यावर संपर्कप्रमुखाची जबाबदारी आहे. पण माझे काहीसे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. यातून संघटनात्मक पातळीवर काही विस्कळीत झाली आहे, याची कबुलीही आमदार शिंदे यांनी दिली.
नगर शहर, पारनेरसह विधानसभेसाठी श्रीरामपूरची मागणी
विधानसभा निवडणुकीत नगर शहर व पारनेर या जागा पूर्वीपासून आम्ही लढवत आहोत. आता जिल्ह्यातील अन्य जागांवरही चाचपणी सुरू आहे. याचा अहवाल आकडेवारीसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत. यावेळी श्रीरामपूरची जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले.
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.