Nagar RPI : 'आरपीआय'मध्ये गटबाजी उफाळली; आठवलेंच्या निर्णयाकडे लक्ष...

Dispute between two groups for the post of District President : जिल्हाध्यक्षपदावरून दोन गटांत धुसफुस
Nagar RPI
Nagar RPISarkarnama
Published on
Updated on

Nagar RPI : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत गटबाजी उफळून आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे यांची निवड बेकायदेशीर असून आपण जिल्हाध्यक्षपदी कायम असल्याचा दावा सुनील साळवे यांनी पत्रकारपरिषद घेऊन केला आहे,

तर जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे यांची जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते लोकशाही पद्धतीने आणि पक्षाच्या नियमानुसार निवड झाल्याचा दावा रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी केला आहे. यातून हा वाद पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यापर्यंत गेला असून, यावर काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Nagar RPI
high Court Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंना हजर राहण्याचे निर्देश

केंद्रीयमंत्री रामदास आठवले येत्या शनिवारी (दि. 3 फेब्रुवारी) श्रीरामपूर व कोपरगाव दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याच्या नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाची बैठक नुकतीच राहुरीला झाली. या बैठकीत कर्जत तालुक्यातील संजय भैलूमे यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडीवर विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी आक्षेप घेतला आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे तक्रार करून त्यांची भेटदेखील घेतली. तशी साळवे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, सरचिटणीस गौरव घोडके, योगेश त्रिभुवन, किरण दाभाडे, राहुल कांबळे यावेळी उपस्थित होते.

साळवे म्हणाले, भैलूमे यांची निवड बेकायदा असून भालेराव आणि वाकचौरे यांना या नियुक्तीचा अधिकार नाही. पक्षाच्या क्रियाशील सदस्यांच्या बैठकीत निवड करण्याची प्रक्रिया असताना तशी ती झालेली नाही. तसेच 2022 मध्ये पाच वर्षांसाठी जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झाली असून माझ्यासह 25 जणांच्या जिल्हा कार्यकारिणीला पक्षाध्यक्ष आठवले व निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी. के. बर्वे यांनी मान्यता दिली.

याची माहिती रामदास आठवले व बर्वे यांना दिली. ती त्यांनी मान्य केली आणि भालेराव यांना फोन करून संघटनेत हस्तक्षेप करण्याचे उद्योग न करण्याची सूचना दिल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले. यावेळी संपर्कप्रमुख भालेराव यांना हटवण्याची मागणीही रामदास आठवले यांच्याकडे केल्याचे साळवे यांनी सांगितले.

आमदार राम शिंदेंकडून सत्काराची घाई...

सुनील साळवे यांनी नगरला झालेल्या महायुतीच्या मेळाव्यास जाऊ नये. त्यांचे नेते आपल्याला विचारत नाहीत, असे भालेराव यांचे म्हणणे होते. मात्र, ते तुम्हाला विचारत नाहीत. माझ्या संपर्कात असतात, असे साळवेंचे म्हणणे होते.

या रागातून त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचा सुनील साळवे यांनी दावा आहे. तसेच नवे जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे यांचा माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सत्कार केल्याबद्दल बोलताना साळवे म्हणाले, 'प्रा. शिंदे यांनी सत्काराची घाई करायला नको होती.'

अकार्यक्षम साळवेंची हकालपट्टीच करा...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे यांची जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते लोकशाही पद्धतीने व पक्षाच्या नियमानुसार निवड झाल्याचा दावा रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली. तोंडचा घास गेल्याने माजी जिल्हाध्यक्षाची धावपळ सुरू झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीतील तोंडचा घास गेल्याने सैरभैर झालेले माजी जिल्हाध्यक्ष यांची धावपळ सुरू आहे. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना ते भेटले, मात्र त्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा 20 वर्षांचा कार्यकाळ अकार्यक्षम होता. क्लेराब्रुस मैदानावर झालेला मेळावा हा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे फेल झाला. कमी गर्दी व कार्यक्रमाचा उडालेला फज्जा यामुळे वरिष्ठांमध्येदेखील नाराजी निर्माण झाली होती. तेव्हाच त्यांनी जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता.

तरीदेखील पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना उत्तर महाराष्ट्र सचिवपदी बढती दिली. मात्र ते वरिष्ठांवर आरोप करून त्यांची बदनामी करीत असल्याचे अमित काळे यांनी म्हटले आहे. रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी निवडणूक आयोगाकडे जाण्याची एकप्रकारे दिलेली धमकी आहे. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना ते आव्हान दिल्यासारखे असून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अमित काळे यांनी केले.

(Edited by Amol Sutar)

R...

Nagar RPI
Vanchit Protest : 'वंचित'च्या आंदोलनाने पोलिसांची धावपळ! अचानक उतरले रस्त्यावर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com