Nashik News, 17 May : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) शेतकऱ्यांचे प्रश्न अग्रभागी आहेत. शेतमालांच्या किमतींवरून केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या रडारवर आहे. त्यामुळे यंदाच्या प्रचारात या प्रश्नांना विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे. निवडणुकीच्या आधी या विषयावर नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलन झाले. भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील त्या प्रश्नांविषयी सहमती व्यक्त केली होती.
कांदा निर्यात बंदीचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर देखील झाला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले. द्राक्षांचेही दर कोसळले. एकंदर शेतमालाचे भाव पडल्यामुळे विरोधकांना प्रचारात अतिशय महत्त्वाचा मुद्दा मिळाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्ताधारी महायुतीच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी देखील हाच मुद्दा उचलला. त्या म्हणाल्या, "शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. या संदर्भात सहकारी बँकांनी देखील समस्येत भर घातली आहे. त्यांनी आपले धोरण बदलले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील."
"शेतकरी आत्महत्या होतात. तो प्रश्न गंभीर आहे. मात्र, त्याच वेळी कृषी क्षेत्रासाठी राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करीत आहे. शेतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी देखील घडतात. त्यांना मदतीसाठी राज्य सरकार पुढे येते. त्याचा विचार व्हायला पाहिजे. शेती क्षेत्रात सकारात्मक घडणाऱ्या घटनांची चर्चा केल्यास शासन विरोधी वातावरण निवळण्यास त्याची मदत होऊ शकेल," असा दावा गोऱ्हे यांनी केला.
सभापती गोऱ्हे यांनी निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही शेतीच्या प्रश्नावर आपले मत मांडले आहे. हे करताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधी पक्षांच्या भूमिकेलाही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे निवडणुकीत चर्चा होणारा हा विषय निवडणूक संपल्यावर तरी संपेल का? त्या क्षेत्रात काही सकारात्मक पावले राज्य सरकारकडून टाकले जातील का? याची चर्चा होत आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.