Dhule Loksabha News : धुळ्यात कोणाची जादू चालणार? मोदी की गांधींची...

Vanchit Bahujan Aghadi वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे बदलली आहेत.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul Gandhisarkarnama

-निखिल सूर्यवंशी

Dhule News : जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जीएसटी, औद्योगिक विकास आणि बेरोजगारी आदी प्रश्‍न, हिंदुत्व विरूद्ध अल्पसंख्यांक लढाईचे चित्र निर्माण करणे आणि शेती, कांदा, सिंचन, बेरोजगारीप्रश्‍नी प्रचारात ठोस आश्‍वासनांअभावी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणूक जनतेच्या हातात गेली आहे.यात नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांची जादू चालणार हा औत्सुक्याचा विषय आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात सरासरी पाच ते साडेपाच लाख मराठा, पावणेचार लाख मुस्लिम, साडेतीन लाख आदिवासी, दीड लाख दलित मतदार आणि उर्वरित लोणी मराठा, माळी, कोळी, धनगर, वाणी, राजपूत व अन्य जातीसंवर्गाच्या मतदारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार रिंगणात असते, तर मुस्लिमबहुल मालेगाव व धुळे मतदारसंघात या समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असता.

मात्र, मुस्लिम समाजाचे सरासरी ८० टक्के मतदान काँग्रेसला, तर मणिपूरप्रश्‍नी नाराज आदिवासी आणि दलित समाजातील नाराज मतदारांचीही काँग्रेसला पसंती राहण्याचे चिन्ह असल्याने काँग्रेसला ‘सेफ झोन'मध्ये असल्याचे वाटत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे बदलली आहेत.

Narendra Modi, Rahul Gandhi
Dhule Congress : ऐन लोकसभेत धुळ्यात काँग्रेसला धक्का; प्रदेश सरचिटणीस झाल्यानंतर दोन दिवसांतच तुषार शेवाळे भाजपवासी

एकीकडे कांद्याच्या निर्यातीचा प्रश्‍न भाजप- महायुतीच्या डोळ्यातून पाणी काढत असताना काँग्रेस- महाविकास आघाडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सहानभुती मिळविण्यासाठी सरसावली आहे. महायुती हिंदुत्व, देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर प्रचारात भर देत आहे. परंतु, या प्रचारात विशिष्ट समुदायाला विरोधाची किनार दिसत असल्याने निवडणुकीतील जातीय समीकरणे बदलत आहेत.

कुणाचा करिष्मा चालेल?

भाजप- महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे प्रचारात दशकाच्या कारकिर्दीत सिंचन, पाणी, रेल्वे, दळणवळणाच्या सुविधा बळकटीकरणाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी शेतीसह सर्वांगिण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवला आहे. कांदा निर्यात, शेती, बेरोजगारीच्या मुद्याला नंदुरबारच्या सभेतून बगल देणारे पंतप्रधान मोदी, धुळ्याच्या सभेत बगल देणारे अमित शहा यांच्या अशा भूमिकेमुळे भाजप- महायुतीच्या उमेदवाराला ही नाराजी दूर सारण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

या स्थितीत देशाची सुरक्षितता, अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेणे, जलसिंचनाचा नार- पार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे लागेल, अशा प्रचारातून महायुती मते मागत आहे. देशाच्या सर्वांगिण हितासाठी आणि जातीयवादाचा बिमोड करण्यासाठी उमेदवारांना विजयी करावे लागेल, हा काँग्रेस- महाविकास आघाडीचा प्रचाराचा मुद्दा ठरत आहे. अशा चुरशीच्या लढतीत मोदी की गांधी यापैकी कुणाचा करिष्मा निकालात परावर्तित होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Edited By : Umesh Bambare

Narendra Modi, Rahul Gandhi
Dhule Loksabha constituency : धक्कादायक ! प्रियंका गांधींच्या स्वागताकडे धुळ्याच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची पाठ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com