Nilesh Lanke, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : "मोदी लाटेपुढं शरद पवार निष्प्रभ, लंकेंना उमेदवारीसाठी भर घातली"

Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांकडून ( संजय राऊत ) रोज अनाकलनीय आरोप केले जातात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे."

Sampat Devgire

नगर दक्षिणमध्ये भाजपचे सुजय विखे-पाटील ( Sujay Vikhe Patil ) उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नीलेश लंके ( Nilesh Lanke ) आहेत. त्यामुळे ही निवडणूक यंदा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. "आमच्या विरोधातील उमेदवाराला बरीच भर घातलेली दिसते. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निवडणुकीत असे प्रयोग केले जातात. मात्र, त्याचा काहीही परिणाम मतदारांवर होणार नाही," असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी व्यक्त केला.

विखे-पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) म्हणाले, "गेल्या निवडणुकीत आमची लढत थेट शरद पवार यांच्याशी होती. त्यावेळी शरद पवार ( Sharad Pawar ) या मतदारसंघात तळ ठोकून होते. तरीही त्यांचे काही चालले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या बाजूनेच मतदारांनी कौल दिला. मोदी लाटेपुढे शरद पवार निष्प्रभ ठरले."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आमच्या विरोधातील उमेदवाराला ( नीलेश लंके ) बरीच भर घातलेली दिसते. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निवडणुकीत असे प्रयोग केले जातात. मात्र, त्याचा काहीही परिणाम मतदारांवर होणार नाही. भाजपच्या यंत्रणेपुढे सर्वकाही निष्प्रभ ठरेल. भाजपचे कार्यकर्ते केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे यंदाही आम्ही आमची जागा राखू यात संशय नाही," असं विखे-पाटलांनी म्हटलं.

विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या धोरण आणि राजकीय प्रचारावर टीका केली. "दुसऱ्याच्या तक्रारी करून तसेच उणी-धुणी काढून निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. विकासाची भूमिका घेऊन प्रचारात उतरावे. विरोधी पक्षांकडे त्याला उत्तर देण्यासाठी कुठलेही मुद्दे नाहीत," असा टीकास्र विखे-पाटलांनी डागलं.

"उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांकडून ( संजय राऊत ) रोज अनाकलनीय आरोप केले जातात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याचाच परिणाम ठाकरे यांच्यावरदेखील झाल्याचे दिसते," असं म्हणत विखेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT