Nilesh Lanke On Ajit Pawar : "...म्हणून अजितदादांची माफी मागितली," राजीनाम्यानंतर लंकेंची प्रतिक्रिया

Nilesh Lanke News : लंके हेच भाजपच्या सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट झालं आहे.
Ajit Pawar| Nilesh Lanke
Ajit Pawar| Nilesh LankeSarkarnama

पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढविण्याची तयारी केली होती. पण, त्यात आमदारकी हा मोठा अडथळा होता. त्यामुळे अखेर शुक्रवारी ( 29 मार्च ) लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना जनतेची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांची लंकेंनी माफी मागितली होती. या माफीचं कारण लंकेंनी सांगितलं आहे.

नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या पत्नी राणी लंके लोकसभा निवडणूक लढतील, अशी मतदारसंघात चर्चा होती. पण, नीलेश लंकेंनीच निवडणूक लढवावी, अशी अट शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ठेवली होती. त्यामुळे लोकसभा लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यावाचून लंके यांच्याकडे पर्याय नव्हता. अखेर शुक्रवारी पारनेरमधील सुपे येथे मेळाव्यात लंकेंनी राजीनामा देत विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे लंके हेच भाजपच्या सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यात जनता अन् अजितदादांची मागितली माफी

"इथल्या सर्वशक्तिमान सत्ताधाऱ्यांना पराभूत करायचं असेल, तर त्यापूर्वी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा राजीनामा देताना मला खूप वेदना होताहेत. जनतेनं मला माफ करावे," असं म्हणत लंकेच्या डोळ्यात अश्रू आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही लंकेंनी माफी मागितली.

Ajit Pawar| Nilesh Lanke
Poonam Mahajan News : पूनम महाजनांच्या उमेदवारीसाठी नगरमध्ये कुणी उचललं मोठं पाऊल..?

...म्हणून अजितदादांची माफी मागितली

एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना नीलेश लंके म्हणाले, "अजितदादांची दहा वेळा माफी मागितली. कारण, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना अजितदादांनी मला भरभरून दिलं. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो. जिल्ह्यातील काही कुटुंबांनी आम्हाला खूप त्रास दिला. आमची विकासाची कामे अडविण्यात आली."

R

Ajit Pawar| Nilesh Lanke
Dharashiv loksabha News : शिंदेंनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिवचा तिढा अखेर सुटला: 'या' पक्षाला मिळणार जागा, पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com