Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज चंद्रपुर येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळजन विधान केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काही कार्यकर्त्यांनी आपल्याला चंद्रपूपर येथे प्रचाराला येऊ नका, असे सांगितले. कारण भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून ओबीसी समाजाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत.
यावेळी भुजबळ म्हणाले, "मुनगंटीवार यांच्या विरोधातील उमेदवार ओबीसी आहे. त्यामुळे प्रचाराला येऊ नका, असा फोन मला चंद्रपूरच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी केले. मात्र याला मी जुमानले नाही. कारण जेव्हा ओबीसींच्या आरक्षण धोक्यात आले तेव्हा धानोरकर यांनी काहीही भूमिका घेतली नव्हती. महायुती सरकारने ओबीसींचे आरक्षण टिकवले आणि मराठा समाजाला दहा टक्के विशेष आरक्षण दिले. हे त्यांचे काम उल्लेखनीय आहे त्याची दखल घेतलीच पाहिजे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भुजबळ म्हणाले, "मला सांगायचे आहे की, ओबीसी प्रश्नावर चंद्रपूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या आमदारांनी कोणतीही भूमिका का घेतली नाही. ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले होते. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला त्यावेळी ओबीसींची घरे जाळली गेली. हल्ले करण्यात आले. पोलिसांवर हल्ले झाले. त्यावेळी धानोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाने कुठलीही भूमिका घेतली नाही. ते ओबीसींच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत. त्यांनी साधा निषेध देखील व्यक्त केला नाही हे समजून घेतले पाहिजे."
यावेळी भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केली. त्यांच्या योजनांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत. त्यांनी विकासाचे व्हिजन ठेवले आहे. बारा हजार कोटींचा निधी खर्च करून त्यांनी ओबीसींसाठी घरे बांधली. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आज आपला देश प्रगतीपथावर आहे. हे समजून घेतले पाहिजे. विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारा मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले."
भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या सभेत ओबीसींचा मुद्दा मांडला. "मात्र जात पाहून मतदान करू नका. विकासासाठी मतदान करा," असे सांगायलाही ते विसरले नाहीत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उमेदवार, वांमंत्री आणि उमेदवार सुधीर मुनगंटीवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, डॉ भूषण कर्डिले, ईश्वर बाळबुधे, हरिष शर्मा, प्रकाश देवतळे, नितीन भटारकर यांचा विविध नेते उपस्थित होते.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.