Nandurbar Lok Sabha News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha News : हिना गावित करणार शक्तिप्रदर्शन; अर्ज भरताना कोण राहणार उपस्थित?

Sampat Devgire

Nandurbar News : भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉक्टर हिना गावित उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विरोधी काँग्रेसला शक्ती प्रदर्शनातून त्या आपली ताकद दाखविणार आहेत. या निमित्ताने महायुतीतील किती सहकारी पक्ष व नेते त्यांच्या प्रचारात आहेत, हे देखील स्पष्ट होईल.

नंदुरबार मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत त्या विजयाची हॅट्रिक करतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत डॉ गावित आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या निमित्ताने त्यांनी मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित उपस्थित असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नंदुरबार मतदारसंघातून भाजपच्या डॉ गावित आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात मुख्य लढत आहे. गोवाल पाडवी हे माजी मंत्री के सी पाडवी यांचे चिरंजीव आहेत. या निमित्ताने काँग्रेसने यंदा तरुण व नवा चेहरा दिला आहे. भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ गावित आणि काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांचे राजकीय ध्रुवीकरण या निमित्ताने झाले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे बोलले जाते.

महाविकास आघाडीचे (Mahavika Aghadi) घटक पक्ष असलेल्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते पाडवी यांच्या प्रचारात उतरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांचा आपल्या गटात प्रवेश करून घेतला आहे. श्री पाडवी यांनी विविध समर्थकांसह महायुतीला पाठिंबा दिला आहे. मात्र महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचे काही नेते अद्याप नंदुरबारमध्ये भाजपच्या प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. त्यामुळे उद्याचे शक्ती प्रदर्शन डॉक्टर गावित यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचे आहे.

नंदुरबार मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीची डॉ. विजयकुमार गावित (Dr Heena Gavit) यांनी खूप आधीपासून तयारी केली आहे. पक्षांतर्गत विरोधकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी थेट ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी, सरपंच यांच्याशी संपर्क निर्माण केला. त्यामुळे संघटनात्मक पदाधिकारी तसेच अन्य नेते मंत्री गावित यांच्यापासून दुरावले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची तसेच मंत्री गावित यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT