Narendra Modi, Rohit R. R. Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: साध्या माणसाविरोधात विश्वनेत्यांना सभा घ्यावी लागली, रोहित पाटलांची टोलेबाजी

Rohit Patil On Devendra Fadnavis: "अनेक लोकं त्या बाजारात जाऊन बैल खरेदी-विक्री करतात. मालकाकडे पाहून बैल खरेदी केल्याचे एक तरी उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे का? आमचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीतून मोदी इकडे येणार आहेत का?"

Pradeep Pendhare

Nagar Lok Sabha Election 2024: एका साध्या माणसाविरोधात विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात, यातच हा साधा माणूस किती भारी असेल, याचा अंदाज येतो. शरद पवारसाहेब (Sharad Pawar) अशीच साधी माणसे, जी जनसामान्यांमध्ये असतात, ती ओळखतात आणि त्यांच्याकडून कामे करून घेतात. अशी माणसं ओळखण्याची शैली फक्त पवार साहेबांकडेच आहे. ती पंतप्रधानांकडे नाही, असं म्हणत रोहित आर. आर. पाटील (Rohit Partil) यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी पाथर्डी आणि बोधेगाव येथे पार पडलेल्या सांगता प्रचार सभेत पाटील बोलत होते. यावेळी नीलेश लंके, आमदार रोहित पवार, प्रताप ढाकणे इत्यादी नेते उपस्थित होते. या सभेत बोलताना रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले, "निवडणूक आयोगाची यांच्यावर मेहरबाणीच आहे. भाजपची दयनीय स्थिती आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) सभा घ्यावा लागत आहेत. आणखी दोन-चार टप्पे निवडणूक आयोगाने वाढविले असते तर, शेवगावमधील बोधेगांवमध्ये पंतप्रधानांची सभा घेण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिले नसते".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. ही संधी महाराष्ट्रातील मतदारांनी वाया घालू नये. महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी या संधीचा पुरेपुर उपयोग करा. यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतराव नाईकांपर्यंत महाराष्ट्रावर काँग्रेस आणि घटकपक्षांनी कधीही अन्याय होऊ दिला नाही. हे आपण विसरणार का? असा प्रश्न रोहित पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शरद पवारांनी नेहमीच दिल्लीत आणि देशात महाराष्ट्राची पत वाढवली असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.

केदारेश्‍वर कारखाना उभा करण्यासाठी दिवंगत लोकनेते बबनराव ढाकणे यांना शरद पवारांनी मार्गदर्शन केले, मदत केली. नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना न्याय देण्याचे काम पवारांनी केल्याने त्यांच्या माध्यमातून शाश्वत विकासकामे नगरमध्ये उभी राहिलीत. या कामांना आता गती देण्यासाठी आपल्या हक्कांचा साधा माणूस दिल्लीला पाठवण्याचे आवाहन रोहित पाटील यांनी केले.

फडवणीसांचा विखेंच्या कर्तृत्वावर विश्वास नाही

ते पुढे म्हणाले, आपल्या साध्या माणसाला हिणवले जात आहे. गावाकडचा माणूस म्हणून कमी लेखले जात आहे. या प्रकारांना मतदानातून उत्तर द्या. गावगाड्याचा माणूसच आता दिल्लीच्या तख्तावर बसवायचा हा निर्धार करून मतदान करा. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) विखेंच्या कर्तृत्वावर विश्वास नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. फडणवीस भाषणाला उभे राहिल्यावर सांगतात की, इथल्या स्थानिक उमेदवाराला पाहू नका. मोदींना पंतप्रधान करायचे आहे, त्यांच्याकडे पाहून मत द्या. याचा एकच अर्थ होतो की, त्यांचा स्थानिक उमेदवाराच्या कर्तृत्वावर विश्वास नसावा, असा टोला रोहित पाटील यांनी लगावला.

मालकाकडे पाहून बैल खरेदी करतात का?

पाथर्डीला बैलांचा मोठा बाजार भरतो. इथली अनेक लोकं त्या बाजारात जाऊन बैल खरेदी-विक्री करत असतील. मालकाकडे पाहून बैल खरेदी केल्याचे एक तरी उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे का? आमचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीतून मोदी इकडे येणार आहेत का? असा मिश्किल टोलाही पाटलांनी लगावला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT