MP Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bjp Shinde Alliance : भाजप खासदाराने शिंदेंच्या मंत्र्याची स्तुती का केली? चर्चांना उधाण

Bjp MP unmesh patil Patil Praises Gulabrao Patil In Jalgaon : खासदार उन्मेश पाटील यांच्याकडून गुलाबराव पाटलांवर कौतुकसुमने

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics Latest News : भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर स्तुती सुमने उधळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जळगाव शहरातील खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे खासदार उन्मेश पाटील एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळी उन्मेश पाटील यांनी मोठे विधान केले.

भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांत फारसे सख्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे सर्व्हेमध्ये मागे पडले आहेत, असे विधान केले होते. यावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली होती. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव महापालिकेने खानदेश महोत्सव आयोजित केला आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी गुलाबराव पाटील यांचा 'आमच्या जिल्ह्याचे डायनॅमिक पालकमंत्री' असा उल्लेख खासदार उन्मेश पाटील यांनी केला. राज्यात सर्वाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या कामांसाठी महापालिका जिल्हा परिषद आणि प्रशासनाला निधी देण्याचा नवा पायंडा गुलाबरावांनी सुरू केल्याचे ते म्हणाले. त्याला गुलाबराव पाटील यांनीही दाद दिली.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या विषयावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये परस्पर दावे आणि विधाने केली जात आहेत. स्थानिक नेत्यांकडून याबाबत होणाऱ्या टीका आणि आरोपांमुळे सध्या जळगावमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची सोय तर केली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT