Raj Thackeray News : महायुतीला आणखी एक भिडू मिळणार? गिरीश महाजन म्हणाले...

Girish Mahajan : सरकार जिथे चुकत असेल तिथे टीका केली पाहिजे.
Raj Thackeray Girish Mahajan
Raj Thackeray Girish Mahajan sarkarnama
Published on
Updated on

Nashik : लोकसभा निवडणुकीसाठी युती, आघाडी यांची आपापल्या पक्षांमध्ये चर्चा आहे. महाविकास आघाडीत 'वंचित' येणार की नाही, याचा निर्णय अजून लागलेला नाही. तर, राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ते देखील महायुतीत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मत व्यक्त केलं आहे.

Raj Thackeray Girish Mahajan
Sanjog Waghere In Shivsena : अखेर संजोग वाघेरे शिवबंधनात; म्हणाले, 'उद्धव ठाकरेंना पाहून भावूक...'

राज ठाकरे जर महायुतीत येत असतील तर कुणालाही त्याबाबत हरकत नसावी.आम्ही सर्व समविचारी आहोत.त्यामुळे त्यांच्या सहभागाने महायुतीचा राजकीय लाभ होईल, असे गिरीश महाजन म्हणाले. महायुती अतिशय आत्मविश्वासाने काम करीत आहे. राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे त्यांच्यातील गोंधळ वारंवार दिसून येतो, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला

महायुतीतील घटकांसह राज ठाकरे हे देखील आमच्यासाठी समविचारीच आहेत. सरकार जिथे चुकत असेल, तिथे टीका केली पाहिजे. त्याने काम करण्यास दिशा मिळते. राजकीय ताकद देखील वाढते. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघ कोणाचा?

येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा फेस्टिव्हल होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मात्र, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा युवकांचा कार्यक्रम असेल, असे महाजन म्हणाले. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्या पक्षाकडे असेल याबाबत आपल्याकडे नेमकी माहिती नाही. त्याबाबत काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्याबाबत मी काहीही विधान करणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com