Hemant Godse, Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : हेमंत गोडसे यांनी डिपॉझिट वाचवावे! संजय राऊत यांचा टोला...

Sanjay Raut criticizes Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सुद्धा मोठ्या फरकाने पराभूत होतील, असा दावा केला आहे. उमेदवार स्वबळावर काय प्रगती करतात हे या निवडणुकीत दिसून येईल.

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वबळावर काय प्रगती करतात हे या निवडणुकीत दिसून येईल. या सर्व उमेदवारांच्या विजयात ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्ते व मतदारांचा मोठा वाटा होता, असा दावा ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर नाशिकच्या हेमंत गोडसे यांनी आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे आणि भाजपच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सुद्धा मोठ्या फरकाने पराभूत होतील, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चेनंतर उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांच्या निश्चितीसाठी खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे शिवसेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आज जे खासदार निवडून आले आहेत त्यांच्या विजयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेशिवाय भाजपच्या (BJP) उमेदवारांची काहीही पत नाही. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी त्यांची क्षमता फक्त शिवसेनेच्या बळावर होती. हे मनातून देखील मान्य केलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही उसने अवसान आणले तरीही नाशिकच्या (Nashik) हेमंत गोडसे यांनी आपले डिपॉझिट वाचून दाखवावे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या सुद्धा मोठ्या फरकाने पराभूत होतील, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या नाशिक - शिर्डी आणि जळगाव या तीन लोकसभा मतदारसंघांबाबत उमेदवारी विषयी आज चर्चा होणार आहे. उमेदवार कोण याविषयी यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही संकेत दिलेले आहेत. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी व त्यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय धोरण ठरविले जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे देखील लक्ष लागले आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT