Police Officer Suicide: नाशिक पोलिस दलात मोठी खळबळ; पोलिस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Nashik Police Officer Shot Himself : नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी स्वतःच्या कार्यालयात आज सकाळी स्वतःवर गोळी झाडली.
Police Inspector Ashok Najan
Police Inspector Ashok NajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी आज सकाळी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हाॅल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडल्याने पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

निरीक्षक नजन यांनी आपल्या डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या नाकाच्या नाकपुडीतून बाहेर आली होती. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आयुक्तालयाचे विशेष पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, ते पुढील तपास करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Police Inspector Ashok Najan
Ram Shinde : 'या' कारणामुळे आली भाजप आमदार राम शिंदेंवर उपोषणाची वेळ !

पोलिस निरीक्षक अशोक नजन गेल्या वर्षभरापासून अंबड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून काम करत होते. अतिशय शांत व संयमी स्वभाव असलेले अशोक नजन यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांनी आपल्या कामातून सहकाऱ्यांवर चांगला वचक निर्माण केला होता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी दहा वाजता ते आपल्या ड्युटीवर आले होते. ते आपल्या केबिनमध्ये बसलेले असताना, बाहेर गोळीबाराचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. त्यांचे काही सहकारी त्यांच्या केबिनमध्ये गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात तातडीने नियंत्रण कक्षास कळविण्यात आले.

निरीक्षक नजन यांनी यापूर्वी एन्काउंटर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांच्यासोबत काम केले आहे. जळगाव, देवळा, कळवण आदी पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केलेले होते. नजन यांनी स्वतःवर गोळी झाडल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. यामागे काय कारण होते हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घरगुती कारणाचादेखील तपास करीत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Police Inspector Ashok Najan
Nashik Loksabha Election : 'हो, दिल्लीला गेलो पण..' ; लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या 'ठाकरें'चं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com