Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse : रावेरमधून गिरीश महाजनांना उमेदवारी मिळाल्यास रक्षा खडसेंची 'ही' असणार भूमिका, म्हणाल्या...

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election News : रावेर मतदारसंघातून यंदा जर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली, तर या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची काय भूमिका असणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर रक्षा खडसे यांनी स्वत: यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वैर आता सर्वश्रूत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अगदी वैयक्तिक पातळीवरही या दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशावेळी आता खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदासंघासाठी गिरीश महाजनांचे(Girish Mahajan) नाव चर्चेत आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर रक्षा खडसे(Raksha Khadse) यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट करत म्हटले की, गिरीश महाजनांचं नाव पुढे येत असेल तर काही हरकत नाही. ते आमचे नेते आहेत. जर पक्षाने तसा आदेश दिला तर आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देखील आणू.

याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचं आव्हान असंल, तरी देखील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वालाच मान्यता आहे आणि जनतेचा मोदींवरच विश्वास आहे. त्यामुळे 2024लाही मोदीच पंतप्रधान होतील. असा विश्वासही रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. या मतदारसंघाच्या खासदार भाजपच्या रक्षा खडसे आहेत. त्या दोनदा या मतदारसंघातून निवडून आल्या असून, तिसऱ्यांदा त्या लढण्याची तयारी करीत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे(Eknath Khadse) हे रावेरमधून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सून विरोधात सासरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT