Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवार, अजित पवार लवकरच पुन्हा एका व्यासपीठावर येणार!

NCP News : जाणून घ्या, कुठे आणि काय निमित्त असणार? ; ...यावेळी तरी त्यांच्यात बोलणे होईल का, याची असणार उत्सुकता
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार अपवादात्मक स्थितीत एका व्यासपीठावर आले आहेत. दौंड (जि.पुणे) येथे अनंतराव पवार इंग्रजी शाळेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला ते 22 ऑक्टोबरला एकत्र आले होते. पण,त्यावेळी त्यांच्यात संवाद झाला नव्हता.

आता अडीच महिन्यानंतर 6 जानेवारी रोजी ते पुन्हा पिंपरी-चिंचवड या दोघांच्याही बालेकिल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी तरी त्यांच्यातील दुरावा कमी होऊन त्यांच्यात बोलणे होईल का, य़ाकडे आता लक्ष लागले आहे.

शंभरावे दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 6 व 7 जानेवारी रोजी उद्योगनगरीत होत आहे. 6 तारखेला सकाळी उद्घाटनास पवार चुलते-पुतणे एका व्यासपीठावर येणार आहेत. शरद पवार(Sharad Pawar) हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे आणि स्वागताध्यक्ष आहेत. तर,उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे यावेळी मुख्य निमंत्रक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Ajit Pawar
Prakash Ambedkar News : आमची अवस्था `मान न मान मै तेरा मेहमान`..

अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे विश्वस्त या नात्याने ते हजर राहत असल्याचे नाट्यसंमेलनाचे आयोजक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईऱ यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकारपरिषदेत सांगितले. यावेळी डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेश साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल तसेच सचिन इटकर, सुनिल महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृत्रिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हेही उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात, तर भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हजेरी लावणार आहेत.

Sharad Pawar and Ajit Pawar
Rupali Chakankar : "अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे 15 वर्षे बारामतीत निवडून आल्या, हे त्यांनी विसरू नये!"

निगडी येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि भाजपच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे आणि पिंपळे गुऱव येथील निळू फुले नाट्यगृहात स्थानिक आमदार चिंचवडच्या भाजपच्या अश्विनी जगताप आणि मावळचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे उपस्थित असणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांची नाटक आणि मी या विषयावर मुलाखत होणार आहे. तर,सायंकाळी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाट्य संमेलन हस्तांतर सोहळ्य़ाला उपस्थिती लावणार आहेत. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष हजर असणार आहेत.

शहरासाठी शंभरावे नाट्य संमेलन भरवून आपले स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना भोईर यांनी यावेळी व्यक्त केली. तर हे संमेलन उत्साही होईल,असे पी.डी.पाटील म्हणाले.दहा लाख लोकं ते ऑनलाईन पाहणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com