Prayagraj Mahakumbhmela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, ‘यशदा’चा ‘तो’ अहवाल ठरला असता संकटमोटक?

Yashada Report on Crowd Management : नाशिकच्या कुंभमेळ्याचा अनुभव पाहता चेंगराचेंगरीची घटना त्या अहवालानुसार टाळता आली असती का?

Sampat Devgire

Mahakumbh Mela News: बुधवारी मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यात तिसरे स्नान झाले. यावेळी गर्दीच्या विक्रमामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. त्यात तीस भाविकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे ही घटना टाळता अली असती का?

महाकुंभमेळ्यात काल मोठी दुर्घटना घडली त्याची दखल पंतप्रधानांपासून तर देशातील विविध यंत्रणांनी घेतली. या घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत पुरविण्यासाठी अनेक यंत्रणांनी मदत केली. मात्र दुर्घटनेतील अपघातग्रस्तांचा जीव वाचविता आला असता का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे?

मौनी अमावस्येला महा कुंभमेळ्यात आखाडा परिषदेचे शाही स्नान या दुर्घटनेमुळे पुढे ढकलण्यात आले. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. असे यापूर्वी क्वचितच कुंभमेळ्यात घडले आहे. यामध्ये आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि महंतांचा समंजसपणा मदतीला आला.

या अहवालामध्ये सबंध कुंभमेळ्याचे विविध भाग करण्यात आले आहेत. त्यात कोणती यंत्रणा कोणत्या भागात कार्यरत राहील, याचे स्पष्ट निर्देश आहेत. असा अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे देखील असू शकतो. 'यशदा'च्या सूचना महा कुंभमेळ्यात अमलात आल्या असत्या तर, कदाचित दुर्घटना टळली असती असे म्हणता येईल.

या दुर्घटनेनंतर तातडीने राज्य शासनाची आढावा बैठक झाली. त्यानुसार सिंहस्थ कुंभमेळ्याची व्यवस्था दुरुस्त करण्यात आली. साधू ग्राम आणि संगम परिसरात नो वेहिकल झोन करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर आता निर्बंध आले आहेत. आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि विविध आणि यांच्या महंतांना मोठी सुरक्षा व्यवस्था आणि त्यांचा वाहनांचा ताफा होता. तो आता नियंत्रणात येईल वाहतूक कोंडीला ते एक प्रमुख कारण होते.

महा कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगम परिसरात आता एकेरी वाहतूक असणार आहे. सर्व व्हीआयपी अधिकारी आणि साधू महंतांसह राजकीय नेत्यांना देण्यात आलेले पासेस रद्द करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी भाविक मुक्काम करतात त्या ठिकाणी शासनातर्फे त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मात्र अशा उपायोजना कराव्यात याबाबत माध्यमे आणि विविध संस्थांकडून वारंवार सरकारला सुचविले जात होते. त्यावर काहीही कार्यवाही सरकारने केली नाही उलट व्हीआयपी कल्चर कसे वाढेल हाच राज्य शासनाचा प्रयत्न होता मंत्रिमंडळाची बैठक व सबंध मंत्रिमंडळाने स्नान करणे हा देखील त्याचाच एक भाग होता याने भाविकांची कोंडी झाली हे लपून राहिलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT