Ajit Pawar : अजितदादांचा वादा ठरला पक्का...जिल्हा बँकेला मिळणार उभारी!

Ajit Pawar; Manikrao kokate and three ministers came together for Nashik district Bank-नाशिकचे तिन्ही मंत्री जिल्हा बँकेच्या प्रश्नावर मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धावले
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक जिल्हा बँक ही. जिल्ह्याचे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे केंद्र आहे. ही बँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व तिन्ही मंत्री एकत्र आलेले दिसले.

अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज जिल्हा बँके संदर्भात बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेला भाग भांडवल देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास जिल्हा बँकेच्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल.

Ajit Pawar
Mahakumbh Mela : धक्कादायक, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे हे आहे कारण...

नाशिक जिल्हा बँकेची १३२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. जिल्हा बँक वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते.

Ajit Pawar
Shivsena Politics : दानवेसाहेब, तुम्हीही चला आमच्यासोबत शिंदेसाहेंबाच्या शिवसेनेत! 'नगरी' शिवसैनिकांसमोर ठाकरेंच्या शिलेदाराची बोलती बंद

सया संदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप बनकर, आमदार

सरोजताई अहिरे, आमदार नितीन पवार आणि आमदार हिरामण खोसकर यांसह प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बँक कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँकेने शासनाकडे ६०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य भाग भांडवल स्वरूपात मागितले होते. त्या प्रस्तावासंदर्भात आजची बैठक झाली. यावेळी अर्थमंत्री पवार यांनी बँकेने व्याजाचे दर कमी करावेत. थकबाकी वसुलीसाठी एक रकमी तडजोड यांसह विविध पर्याय राबवावेत. जिल्हाधिकारी आणि सहकार उपनिबंधकांनी या संदर्भात पुढाकार घेऊन तातडीने बँकेला मदत करावी. बँकेच्या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना केल्या.

जिल्हा बँकेच्या अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मंत्री आणि विविध आमदार एकत्र आल्याचे आज दिसले. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या कर्मचारी संघटनेने या संदर्भात सातत्याने आग्रही भूमिका मांडली आहे. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस मुंबईत तळ ठोकून याबाबत समन्वय आणि संपर्काचे चांगले काम केले.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते. सध्या जिल्हा बँकेची स्थिती खूपच अवघड बनली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी निवडणुकीत दिलेला तो शब्द पाळला. त्यांनी आज यानिमित्ताने अजितदादा यांनी आपला 'वादा' पाळला, असे म्हणता येईल.

उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतल्याने त्यावर अपेक्षित कार्यवाही झाल्यास जिल्हा बँक अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच या बँकेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com