Mahant Rajendradas Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahakumbh Mela: महाकुंभमेळ्यातील साधू कोणामुळे झालेत त्रस्त? कोण आहेत नकली साधू?

Mahakumbh Mela: Sadhu politics,Fake Sadhus cause trouble at Allahabad's Kumbh Mela-प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात नकली साधूंच्या उपद्रवाने आखाडा परिषद संतप्त

Sampat Devgire

Mahant Rajendradas: प्रयाग्रजचा कुंभमेळा सध्या माध्यमांमध्ये जगभर चर्चेत आहे. महाकुंभमेळ्यात किन्नर आणि साध्वी यांच्या बातम्यांनी आखाडा परिषद त्रस्त झाली आहे. आता या नकली साधूंना महाकुंभमेळ्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

प्रयाग्रजचा महाकुंभमेळा माध्यमांसाठी चर्चेचा विषय आहे. देशातील सर्व प्रमुख माध्यमे येथे एकत्र झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमांतून महा कुंभमेळ्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र या बातम्यांमध्ये खऱ्या साधून ऐवजी बनावट साधूंचीच चर्चा होत आहे.

महा कुंभमेळ्यात किन्नर आणि अनेक महिला साधूंनी माध्यमांना आकर्षित केले आहे. या महिला आणि किन्नर साधूंची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. वस्तूत: या साधूंना आखाडा परिषदेची मान्यता नाही. मात्र हे साधू चर्चेत राहण्यासाठी विविध चित्रविचित्र उद्योग करीत असल्याने त्याचा आता साधूनाही त्रास होऊ लागला आहे.

यासंदर्भात आखाडा परिषदेचे सदस्य आणि निरमोही अनिचे पंतप्रधान महंत राजेंद्रदास आक्रमक झाले आहेत. महाकुंभमेळ्यात आखाडा परिषद हीच प्रमुख आयोजक आहे. महिला अथवा किन्नर यांच्या कोणत्याही आखाड्याला मान्यता दिलेली नाही. मात्र माध्यमांतून असे आखाडे असल्याच्या बातम्या येतात. त्यामुळे साधू चांगलेच संतप्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

काय आहे आखाडा परिषद?

कुंभमेळ्याचे आयोजन आखाडा परिषदेतर्फे केले जाते. या परिषदेत केवळ तेरा अनी, आखाड्यांनाच मान्यता आहे. यामध्ये श्री पंच दशनाम आखाडा, श्री पंच दशनाम आवाहन आखाडा, श्री शंभू पंच अग्नी आखाडा, श्री शंभू पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री निरांजनी पंचायती आखाडा हे शैव आखाडे आहेत.

वैष्णव साधूंचे आखाडे

वैष्णव साधूंचे श्री पंच दिगंबर आखाडा, श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी आणि आखाडा आहेत. उदासीन समाज साधूंचे तपोनिधी श्री आनंद आखाडा, श्री पंचायती आखाडा नया उदासीन, श्री पंचायती आखाडा बडा उदासीन आणि श्री पंचायती आखाडा निर्मल हे उदासीन समाजाच्या साधूंचे आखाडे आहेत.

अनधिकृत साधूंचा गवगवा का?

या व्यतिरिक्त किन्नर अथवा महिला साधूंच्या कोणत्याही आखाड्याला मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र चित्रविचित्र वर्तन आणि देखावा तसेच खोटा मेकअप करून या साध्वी कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांना आकर्षित करतात. या भाविकांची व माध्यमांच्या प्रतिनिधींची दिशाभूल केली जाते.

वास्तविक किन्नर आणि साध्वी या महाकुंभमेळ्याचा भाग नाही. मात्र त्यांचीच खूप चर्चा होत असल्याने आखाडा परिषद आणि सर्वच अधिकृत साधू आता संतप्त झाले आहेत. त्यांनी या नकली साधूंना तातडीने कुंभमेळ्यातून हाकलून द्यावे, यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

प्रत्येक कुंभमेळ्यात नकली साधू चर्चेत असतात. हे साधू कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांची वेगवेगळ्या प्रकारे दिशाभूल करतात. स्थानिक भाविकांचा देखील ते पाठिंबा मिळवत असतात. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत शाही स्नान आणि मुख्य मिरवणुकीत त्यांना कोणतेही स्थान नसते.

माध्यमांमध्ये चर्चेत कसे राहायचे याचे कौशल्य आणि कसब असल्याने या साधूंचीच चर्चा होते. जगभरातून आलेले माध्यमे या साधूंनाच कुंभमेळा म्हणून प्रकाशित करत असतात. आता हा प्रशासन आणि आखाडा परिषद दोघांसाठीही डोकेदुखीचा विषय बनला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT