Ahilyanagar Voting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Voting Percentage : मतदानाचा टक्का वाढला, धोका वाढला; अहिल्यानगरमध्ये 71 टक्के मतदान, परिवर्तनाची चर्चा

Assembly Election Ahilyanagar twelve constituencies Shirdi percent polling : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याने धक्कादायक असा निकाल लागले, असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात एकूण सरसरी 71.73 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढल्याने कोणाला धक्का, याची चर्चा आता रंगली आहे. मतदान होताच, पैजा देखील रंगल्या आहेत.

श्रीरामपूरमध्ये मतदानाच्या काही तासांपूर्वी शिवसेना उमदेवाराच्या वाहनावर झालेला गोळीबार, शिर्डी परराज्यातील मतदान आणि कर्जत-जामखेड मतदारसंघात पैसा वाटपाचे काही वाद वगळता सर्वत्र मतदान शांतेत झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला दर तासाचा मतदानाचा आढावा घेत होते.

सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा होत्या. अकोले 71.97, संगमनेर 74.57, शिर्डी 74.52 (Shirdi), कोपरगाव 71.47, श्रीरामपूर 70.12, नेवासा 79.89, शेवगाव 68.21, राहुरी 74.50, पारनेर 66.27, अहिल्यानगर शहर 63.85, श्रीगोंदा 72.28, कर्जत-जामखेड 75.15 टक्के मतदान झाले. विधानसभा 2019 मध्ये 69.41 टक्के मतदान झाले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 5.96 टक्के मतदान (Voter) झाले होते. सकाळच्या थंडीमुळे मतदानाचा वेग मंदावला होता. यानंतर मतदानाचा वेग काहीसा वाढला. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 18.24 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का यानंतर वाढत गेला. दुपारी दीड वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले. चारनंतर मतदानाचा वेग खूप वाढला. 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. पण, साडेतीन वाजता जिल्ह्यात 47.85 टक्के मतदान झाले.

जिल्हाधिकारी वॉर रुममध्ये तळ ठोकून

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी कार्यालयात उभारलेल्या वॉर रुममध्ये दिवसभर बसून सीसीटीव्हीद्वारे मतदान केंद्रावर नजर ठेवून होते. काही संशयास्पद आढळल्यास, मतदान केंद्राध्यक्षांना थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून मार्गदर्शन करत होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 61.95 टक्के मतदान झाले.

कर्जत-जामखेड, शिर्डी मतदारसंघातील व्हिडिओ व्हायरल

कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात पैसा वाटपावरून टोकाचे वाद झाले. शिर्डीमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी मतदान केल्याचा आणि त्याची माहिती काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

माजी आमदाराच्या वाहनावर गोळीबार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरामपूरमधील उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावर मतदानाच्या काही तास अगोदर गोळीबार झाला. यामुळे श्रीरामपूरमधील मतदारसंघातील निवडणूक वेगळ्या वळणार पोचली. या गोळीबाराबाबत पोलिसांना वेगळाच संशय आहे.

भाजप आमदार राजळेंनी घेतलं कोंडून

अहिल्यानगर जिल्ह्याच्या मतदानाच्या शेवटची शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोठा गोंधळ झाला. जमावाच्या रोषापासून वाचण्यासाठी भाजप महिला आमदार मोनिका राजळे यांनी स्वतःला समर्थकांसह खोलीत कोंडून घेतलं. हा प्रकार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील शिरसाटवाडी (ता. पाथर्डी) इथं झाला. शेवटी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त आल्यानंतर आमदार राजळे यांना बंदोबस्तात शिरसाटवाडीतून बाहेर पडल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT