Maharashtra Board SSC marksheet symbols : बारावीनंतर दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देखील वितरीत झाली आहे. पुढील महाविद्यालयीन शैक्षणिक वाटचालीसाठी ही दोन्ही कागदपत्रे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरतात.
पण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावरील काही सांकेतिक चिन्हांबाबत, सोशल मीडियावर संभ्रम निर्माण केला जात आहे. यातून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गोंधळ उडत आहे. शिक्षण मंडळाकडे याबाबत तक्रारी प्राप्त होताच, राज्य शिक्षण मंडळाने यावर सांकेतिक चिन्हांची सविस्तर माहिती दिली आहे.
दहावीचा मार्च 2026चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या (Student) गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवरील काही सांकेतिक चिन्हांबाबत सोशल मीडियासह काही माध्यमांत गैरसमज पसरवण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर अधिकृत माहिती दिली आहे.
विशेषतः टक्केवारीसमोर दिसणारे ‘£’ हे चिन्ह ‘ब्रिटिश पौंड’ दर्शवित असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने हे स्पष्टीकरण फेटाळून लावत संबंधित चिन्हाचा शैक्षणिक (Education) संदर्भ किती महत्त्वाचा आहे, हे सांगितलं आहे.
राज्य शिक्षण मंडळाने गुणपत्रिकेवरील सांकेतिक चिन्हांबाबत माहिती देणारं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांमध्ये निकालासंदर्भातील विविध बाबी स्पष्ट केल्या आहे. ही सांकेतिक चिन्ह अनेक वर्षांपासून वापर केला जात असून, त्याचे स्पष्टीकरण प्रत्येक गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या मागील बाजूस छापले आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे मंडळाने म्हटले आहे.
‘XX’ ही खूण विषयातील सूट दर्शविते, तर ‘AA’ ही खूण अनुपस्थिती दर्शविते. ‘NN’ ही खूण लागू न पडणारा विषय दर्शविते आणि ‘CC’ ही खूण विषयाची संपादणूक रद्द केल्याचे दर्शविते. तसेच ‘*’ ही खूण प्रथम श्रेणीसाठी आवश्यक अतिरिक्त गुण दिल्याचे सूचित करते.
‘£’ या चिन्हाबाबत सर्वाधिग गैरसमज असून, त्याचा संबंध ब्रिटिश पौंडशी जोडला गेला आहे. यावर राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले, की ‘सर्वोत्तम पाच’ या निकषानुसार अनिवार्य सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्या पाच विषयांच्या आधारे 500 पैकी एकूण गुण व टक्केवारी दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते.
याशिवाय क्रीडा, एनसीसी, स्काऊट-गाईड, कला क्षेत्रातील प्रावीण्य किंवा सहभागासाठी दिलेल्या अतिरिक्त गुणांसाठीही स्वतंत्र चिन्हांचा वापर करण्यात येतो. विद्यार्थी, पालक व शाळांनी गुणपत्रिकेवरील या सांकेतिक चिन्हांचा अर्थ समजून घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.