School Verification : दहा वर्षानंतर पुन्हा शाळांची पटपडताळणी; गोलमाल करणाऱ्या शिक्षकांची धास्ती वाढली

Teachers panic as fake claims of school verification drive by education department spread across aided and semi-aided schools in Maharashtra : राज्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांची पटपडताळणी सुरू करण्यात आली आहे.
School Verification
School VerificationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra school verification : बनावट विद्यार्थी दाखवून पट फुगवणे आता गोलमाल करणाऱ्या काही शिक्षकांच्या अंगलट येणार आहे. बनावट विद्यार्थी शोधासाठी राज्याचा शिक्षण विभाग सरसावला असून, राज्यात सर्वत्र पटपडताळणी सुरू केली जाणार आहे.

त्यात जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांचा समावेश आहे. तब्बल दहा वर्षांनंतर ही मोहीम होत आहे. या मोहिमेला काही शिक्षकांनी विरोध सुरू केला आहे, तर गोलमाल करणाऱ्या शिक्षकांनी याची धास्ती घेतल्याचे दिसते.

या पटपडताळणीपासून वाचण्यासाठी काही शाळांनी नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या (पॅट) परीक्षेच्या दिवशी 11, 15 आणि 22 एप्रिल या तारखा जाहीर केल्या आहेत. पहिल्या विद्यार्थ्यांचीही (Student) गणती केली जाणार आहे. 2013 व 2015 मध्ये पटपडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बनवेगिरी सापडली होती.

अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केल्यास, जिल्हा परिषदेच्या 3 हजार 531, तर खासगीच्या 490 शाळा (School) आहेत. प्रथम इयत्ता दुसरी ते आठवी, नववी आणि अकरावीचे हजेरीपट, प्रत्यक्ष उपस्थिती पडताळण्यात येणार होती. मात्र, आता ही पटपडताळणी पॅट परीक्षेच्या दिवशी केली जाणार आहे.

School Verification
Maharashtra Teacher Salary Cut : शिक्षकांची हतबलता शिगेला; 700 हून अधिक शिक्षक रस्त्यावर? उपासमारीचं मोठं संकट समोर

या पटपडताळणीसाठी क्षेत्रिय स्तरावरील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, लेखाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकचे अध्यक्ष व विस्ताराधिकारी आदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

School Verification
Fake Disability Certificate : धास्ती वाढली, बनावट दिव्यांग प्रकरण तापलं! महसूल विभागातील 56 कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई

या शाळांना वगळले

पडताळणीचे आदेश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. या पटपडताळणीच्या तयारीसाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील संबंधित अधिकार, कर्मचाऱ्यांची बैठक झाली. 11, 15 आणि 22 एप्रिलला होणाऱ्या पटपडताळणीत द्विशिक्षकी किंवा 60 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांना वगळण्याच्या सूचना ऑनलाइन बैठकीत देण्यात आलेल्या आहेत.

परीक्षांमुळे पटपडताळणी प्रक्रियेला अडथळा

राज्यातील शाळांची पटपडताळणी प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर सेनेने केली आहे. याच कालावधीत इयत्ता दुसरी, इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा सुरू आहेत. इतर शैक्षणिक उपक्रमही सुरू आहेत. त्यामुळे शाळांच्या नियमित शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील बहुतांश शाळांनी त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच निश्‍चित केले आहे. काही ठिकाणी पुढील इयत्तांसाठी जादा तासांचे नियोजन आहे. त्यामुळे अडचणी येऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com