Uddhav Thackeray & Nilam Gorhe Sarkarnam
उत्तर महाराष्ट्र

Nilam Gorhe disqualification : अपात्रतेचा चेंडू टोलवला पुन्हा न्यायालयाकडे?

Sampat Devgire

Shivsena Politics on Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे गटात जाहीरपणे प्रवेश केला. मात्र विधीमंडळातील चर्चेत त्याची चर्चा टाळण्यावरच सत्ताधारी गटाचा प्रयत्न दिसून आला. एकनाथ शिंदे- भाजपचे सरकार आज पुन्हा त्यांच्या मदतीला धाऊन आल्याचे दिसून आले. (Eknath Shinde Government came to the aid of Nilam Gorhe)

नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्या अपात्रतेबाबत विधान परिषदेत चर्चा होऊ शकत नाही. याबाबत जोपर्यंत त्यांना कायद्याने अपात्र घोषीत केले जात नाही तोपर्यंत त्या काम पाहतील. या निर्णयाने या प्रकरणात शिवसेनेला (Shivsena) पुन्हा न्यायालयात (High Court) जाण्याचे सुचीत केल्याचे दिसते.

या विषयावर आज तालीका सभापती निरंजन डावखरे यांनी १८ जुलैला झालेल्या चर्चेवरील शासनाची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा, संविधानातील दहावी सुची तसेच विधीमंडळ सदस्य अपात्रतेचा कायदा असे विविध संदर्भ आणि राज्याच्या अधिवक्त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे आधार घेत या विषयावर विधानपरिषदेत चर्चा होऊ शकत नाही.

यावर त्यांना कायद्याने अपात्र ठरवले जात नाहीत, तोपर्यंत त्या काम पाहतील असे स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवसेनेकडे पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावणे हाच पर्याय राहतो. तो मार्ग स्विकारतील काय, याची उत्सुकता आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अॅड अनिल परब, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेसंबंधी काही मुद्दे उपस्थित केले होते. या चर्चेतील मुद्द्यांचा परामर्ष नमुद करण्यात आला. श्रीमती गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती.

सभापती पद रिक्त असल्याने नैसर्गिकरित्या या पदाच्या काम उपसभापती यांच्याकडे आले आहे. त्यामुळे त्यांनी या पदावर विराजमान होने योग्य होणार नाही. त्यांच्याबाबत कोणता नियम लावायचा असा प्रश्न होता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात असे म्हटले आहे की, अपात्रतेसंबंधीचे म्हणने ऐकण्याचा अधिकार सभापती कींवा उपसभपतींचा असतो. या पदावर असताना पक्षांतर करता येते का?. यासंदर्भात अनुसूची १० नुसार महाधिवक्ता यांच्याकडून यांच्याकडून मत मागविण्यात आल्याचे डावखरे म्हणाले.

या उत्तरादरम्यान अशा व्यक्तीने ती पदावर असताना तीने ती ज्या पक्षाची सदस्य आहे, त्या पक्षाची सदस्यत्व सोडून दिले आणि ती जोवर हे पद धारण करेल तोवर त्या राजकीय पक्षात सामील झाली नाही, कींवा अन्य राजकीय पक्षांचा सदस्य झाली नाही किंवा अश ापदावर निवडून आल्यावर ती पुन्हा ती त्या पक्षात सामील झाल्यास काय याचे स्पष्टीकरण आहे, असे सभापती डावखरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT