Neelam Gorhe अपात्रता प्रकरण : पक्षांतर केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवावे हा शिवसेनेचा अक्षेप फेटाळण्यात आला आहे. सभापतीपदी असलेली व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नसल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले. (Rejecting Shivsena`s objections, Neelam Gorhe will will serve as Deputy Chairman of Legislative Council)
शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाल्याने आक्षेप घेत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विधान परिषदेत शिवसेनेच्या आक्षेपाने गदारोळ झाला होता. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते अनिल परब तसेच विविध नेत्यांनी उसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) राजीनामा देऊन एकनाथ ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचे स्पष्ट होते. पक्षांतर बंदी कायदा तेसच विविध संकेंतानुसार त्यांना या पदासाठी अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. यावरून बराच गोंधळ झाला होता. उपसभापती गोऱ्हे यांनी कामकाज करण्यावर देखील आक्षेप घेण्यात आला होता.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोऱ्हे यांची बाजू लाऊन धऱत हे आक्षेप फेटाळले होते. त्यानंतर सदस्यांच्या आग्रहानुसार याबाबत राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचे मत घेण्यात आले.
यासंदर्भात आज दुपारच्या सत्रात तालीका सभापती निरंजन डावखरे यांनी याबाबतचे निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, श्रीमती गोऱ्हे यांनी सभापती म्हणून काम सुरू करताना त्यांचा जो पक्ष शिवसेना होता, त्यात बदल झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे तसेच संविधानातील दहाव्या परिशीष्टातील अनुसूची १०२/ २ अन्वये त्यांच्याविषयी अपात्रतेची कोणतीही शक्यता दिसून येत नाही.
पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीत देखील त्याबाबत अपात्रता सिद्ध होईल अशी स्थिती नाही. त्यामुळे याबाबतचे सर्व आक्षेप फेटाळण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.