Suraj Mandhare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmers suicide: शेतकरी आत्महत्येच्या मुळाशी जाणार... कृषी आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय!

Maharashtra farmer suicide issue serious Agriculture Commissioner Suraj Mandhare announces special action team-राजकारणाचा विषय असलेल्या शेतकरी आत्महत्येवर आयुक्त सुरज पांढरे यांनी शोधला नवा पर्याय

Sampat Devgire

Suraj Mandhare News: गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकरी आत्महत्या हा राजकीय विषय बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा सातत्याने वादाचा विषय असतो. त्यावर आजवर अनेक उपाय आणि निर्णय झाले आहेत.

राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. नैसर्गिक आपत्ती आणि पिकांना अपुरा बाजार भाव हे त्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे विधिमंडळापासून लोकसभेत त्यावर सरकारवर आरोप होत असतात.

यासंदर्भात राज्य शासनाच्या कृषी विभागाने एक वेगळा पर्याय निवडला आहे. आयुक्त सुरज मांढरे यांनी या संदर्भात माहिती दिली. शेतकऱ्यांना सक्षम करणे हा यावर हमखास परिणाम करणारा निर्णय होऊ शकतो.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हा एक गंभीर राजकीय विषय बनला आहे. विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्याने निवडणुकीतील राजकीय आरोप प्रत्यारोपांचा तो विषय बनला. मात्र शेतकरी आत्महत्या रोखण्यात अद्याप यश आलेले नाही.

या संदर्भात कृषी आयुक्त मांढरे यांनी शेतकरी आत्महत्या हा केवळ नुकसान भरपाई चा विषय नाही, असे म्हटले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खास कृती दल स्थापन करून उत्पन्न आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

गेल्या पाच वर्षात राज्यात रोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात दुष्काळामुळे आणि पीक पद्धतीमुळे ही संख्या अधिक आहे. गतवर्षी विधिमंडळात झालेल्या चर्चेत शासनाने त्याची कबुली दिली होती. 2024 या वर्षात राज्यात १०६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ९५२ शेतकरी मराठवाड्यातील होते.

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाय केले जातात. आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. जागतिक हवामान बदल नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक ताणतणाव यातून शेतकरी मानसिक दृष्ट्या अस्थिर होतो. नेमके उपाय आणि शेतकरी सक्षम करण्याचे काम कृषी विभागाच्या विशेष कृती दलाकडून होणार आहे.

शेतकरी आत्महत्येवर राजकीय स्तरावर सातत्याने आरोप प्रत्यारोप होतात. मात्र हा सामाजिक आणि आर्थिक विषय म्हणून पाहण्याचा प्रयत्न कृषी आयुक्त यांनी केला आहे. यांच्या संकल्पनेतील विशेष कृती दल यामध्ये काय भूमिका बजावते, हे महत्त्वाचे ठरेल. त्यादृष्टीने कृषी आयुक्तांनी उचललेले हे चौकटी बाहेरचे पाहून चर्चेचा विषय आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT