NCP delegation at Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola NCP News : भुजबळांच्या मतदारसंघात राज्य सरकारविरोधात झाली तीव्र निदर्शने

Sampat Devgire

NCP demonstration news : राज्यातील सरकारला सामाजिक भान राहिलेले नाही. त्यांना राज्य आणि जनतेशी काहीही देणे-घेणे नसल्याने त्यांनी रोजंदारी कामगारांची फौज निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून अतिशय गंभीर सामाजिक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शाहू शिंदे यांनी केली. (The decision of the state government will create serious social problems)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) (शरद पवार) (Sharad Pawar) कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करीत सरकारचा निषेध केला.

येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कंत्राटी भरतीच्या निर्णयाचे तीव्र पडसाद युवकांमध्ये उमटले. त्यामुळे या आंदोलनात युवकांची संख्या लक्षणीय होती. खुद्द मंत्र्यांच्याच मतदारसंघात हे आंदोलन झाल्याने राजकीयदृष्ट्या त्याला महत्त्व दिले जात आहे.

या वेळी ॲड. शिंदे यांनी सरकारच्या या निर्णयाने युवकांच्या भविष्यातील शासकीय नोकरीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. शासनाचा कंत्राटी भरतीचा निर्णय सामाजिकदृष्ट्या तसेच तरुणांच्या भविष्यासाठी घातक आहे. शासन असे निर्णय घेऊन युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा दिला.

ॲड. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विंचूर चौफुली येथे येवला-नाशिक महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत शासन निर्णयाच्या प्रतींची होळी केली. कंत्राटी भरतीमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या स्वप्नांना लगाम बसणार आहे.

ते पुढे म्हणाले, भविष्यात नोकरी दिवास्वप्न ठरणार असून, नऊ कंपन्यांच्या स्वाधीन शासकीय भरती करून ठरावीक मानधन देण्याचा हा निर्णय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. यामुळे प्रगतीलाही खीळ बसणार आहे. भांडवलदारधार्जिना हा निर्णय असल्याने शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

शहराध्यक्ष योगेश सोनवणे, विधानसभा उपाध्यक्ष अजीज शेख, जिल्हा उपाध्यक्ष दीपक लाठे, तालुका उपाध्यक्ष भारत धनगे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमित शिंदे, साईनाथ मढवई, फिरोज शेख, मिलिंद पाटील, नीलेश भदाणे, कालू शेख, नारायण गायकवाड, बाळासाहेब कसबे, राजेश कदम, शंभू शिंदे, योगेश शिंदे, काका वाणी, माजित अन्सारी, संदेश शिंदे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT