Nandurbar Protest News : ...तर ‘ओबीसी’ वर्गावर होणार मोठा अन्याय!

If that happens, injustice will be done with OBC class-नंदुरबारच्या ‘ओबीसी’, समविचारी संघटनांचे आरक्षणप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
OBC delegation at Nandurbar
OBC delegation at NandurbarSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar OBC News : मराठा समाजाने कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करून ओबीसीच्या वाट्यात हक्क मागू नये. ‘ओबीसी’ कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास तो ‘ओबीसी’ घटकांवर अन्याय होईल, अशी तक्रार ‘ओबीसी’ संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (OBC and like- minded organisations aggrssive on reservation issue)

मराठा (Maratha) समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबाबत राज्यभर (Maharashtra) आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओबीसी’ (OBC) संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण तापले आहे.

OBC delegation at Nandurbar
Bhujbal v/s Gholap Politics : बबनराव घोलप यांच्या तोंडी निष्ठेची भाषा शोभत नाही!

मराठा समाजाला ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी बांधवांचे प्रचंड नुकसान होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता कुणाचाही विरोध नसून त्यांनी स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षणाचा आग्रह धरावा, अन्यथा ‘ओबीसी’ समाज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन पुकारेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

शिष्टमंडळातील नेते या वेळी म्हणाले, असे घडल्यास भविष्यात मोठा संघर्ष उद्‍भवू शकतो. त्यामुळे मराठा समाजाला ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण देऊ नये.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर मोहन माळी, पंडित माळी, निंबा माळी, एजाज बागवान, जगन्नाथ माळी, वासुदेव माळी, मधुकर माळी, पितांबर खैरनार, नरेंद्र जाधव, रामकृष्ण मोरे, शरीफ बागवान, चंद्रकांत खेडकर, भगवान कुंभार, एकनाथ कुंभार यांच्या सह्या आहेत.

OBC delegation at Nandurbar
Nashik Shivsena News : भेटीगाठी म्हणजे दबावाचे राजकारण नसते!

या आंदोलनात समस्त माळी पंच, अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारती महात्मा फुले समता परिषद, महात्मा फुले फाउंडेशन, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, भटके विमुक्त हक्क परिषद, ओबीसी संघर्ष समिती आदी संघटनांनी सहभाग घेतला.

OBC delegation at Nandurbar
Karad NCP News: कराड उत्तरच्या कामांवरील स्थगिती उठेना; बाळासाहेब पाटील अवमान याचिका दाखल करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com